आज रोशनगेट ते कटकट गेट 16 मालमत्ता काढले, नागरीक करत आहे सहकार्य
 
                                रोशनगेट ते कटकट गेट 16 मालमत्ता काढले...
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)
रोशनगेट ते कटकट गेट बारा मीटर रस्ता रुंदीकरणात आज एकूण 16 बाधित मालमत्ता काढण्यात आले.
यामध्ये तेरा दुकाने व तीन निवासांचा समावेश आहे. प्रकरणात सविस्तर माहिती अशी आहे की सदर रस्ता चाळीस फुटाचा असून या रस्त्यावर रस्ता बाधित करणारी मिळकती जास्त असल्याने व सदर भाग हा निवासी आणि वाणिज्य दोन्ही वापर असल्याने काही तांत्रिक अडचण येत होते. परंतु न्यायालयाच्या आदेशाने आणि नागरिकांच्या सहकार्याने हा काम प्रगतीपथावर आहे. आज एकूण वाणिज्य निवासी वापर व्यवस्था मध्ये 16 बाधित मिळकती निष्कशित करण्यात आली.
अत्यंत शांतपणे आणि नागरिकांच्या सहकार्याने ही कारवाई पुढे जात आहे. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे हे वारंवार या कामाचा आढावा घेत आहे तर उपायुक्त अतिक्रमण विभाग सविता सोनवणे यांनी सुद्धा या ठिकाणी पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व पथकातील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
ही कारवाई आता वेगाने सुरू झाली असून नागरिक स्वतः आपले बांधकाम काढत आहे. सदरील कारवाई नगरा रचना विभागाचे विभागाचे रामेश्वर सूर्यवंशी, रत्नदीप देशपांडे, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद माजी सैनिक व विद्युत विभागाचे कर्मचाऱ्यांनी सहकार्याने पार पडली.
उद्या सकाळी 9.30 वाजता पुन्हा कारवाई सुरू होणार आहे. नागरिकांनी सदरील कारवाईत सहकार्य करावे असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            