खुलताबाद उर्स निमित्त वाहतूक मार्गात बदल...

 0
खुलताबाद उर्स निमित्त वाहतूक मार्गात बदल...

खुलताबाद उर्स, वाहतूक मार्गात बदल...

खुलताबाद, दि.2(डि-24 न्यूज) -

हजरत शेख मुन्तजबोद्दीन जर जरी बक्ष यांचा 739 वा उर्स महोत्सव दि. 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान खुलताबाद येथे होत आहे. या कालावधीत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी खुलताबादला जाणारी व येणारी जड वाहतूक मार्गात बदल करण्यात येत असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत. 

वाहतुक मार्गातील बदल याप्रमाणे-

कन्नड – वेरुळ – खुलताबाद – दौलताबाद – छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक - कन्नड – वेरुळ – कसाबखेडा फाटा – वरझडी – माळीवाडा – शरणापूर फाटा – मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे या मार्गाने जाईल

छत्रपती संभाजीनगर – दौलताबाद – खुलताबाद – वेरुळ – कन्नडकडे जाणारी वाहतूक- छत्रपती संभाजीनगर – शरणापूर फाटा – माळीवाडा – वरझडी – कसाबखेडा फाटा – वेरुळ मार्गे कन्नड कडे जाईल.

फुलंब्री – सुलतानपुर – खुलताबाद – वेरुळ – कन्नड कडे – जाणारी वाहतूक फुलंब्री – छत्रपती संभाजीनगर – शरणापूर फाटा – माळीवाडा – वरझडी – कसाबखेडा फाटा – वेरुळ मार्गे कन्नडकडे जाईल,असे कळविण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow