महिला व बालविकास व दामिनी पथकाने रोखला शहरात एक बालविवाह...
महीला बालविकास व दामिनी पथकाने रोखला बालविवाह...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) - बीड बायपास येथे आज दुपारी 12.05 वाजता एक विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. दिग्रस, जिल्हा परभणी येथील वर आणि वधू राहणार लोखंडी , जिल्हा परभणी. वधूचे वय आधार कार्ड बघितले असता 16 ते 17 वयाची दिसून आली. हा विवाह सोहळा महिला व बालविकास समीतीच्या सदस्य आम्रपाली बोर्डे यांनी दामिनी पथकाचे उपनिरीक्षक कांचन मिरधे यांना फोन करून कळविले व पथक घटनास्थळी पोहोचले. नवरीचे मेकअप चालू होते. नवरीचे आधार कार्ड विचारले असता मुलीने सांगितले की मी मुंबईची आहे आई धुनी भांडी करते. आमची गरीबीची परिस्थिती आहे. नवरदेवाच्या वेषभुषेत एक मुलगा दिसून आला तो रिक्षाचालक आहे. माझे वय 22 वर्षे आहे असे त्याने सांगितले. नवरदेव व नवरीचे आधारकार्ड तपासले असता नवरीचे वय 17 वर्षे 6 महीने दिसून आले. त्यावरून महिला व बालविकास सदस्य आम्रपाली बोर्डे यांनी बंद पत्रामध्ये त्यांचे लेखी जवाब घेतले. बालविकास विभाग, दामिनी पथक, सातारा पोलीस स्टेशनचे बीट मार्शल कर्मचारी यांनी नवरदेव व नवरीचे आई वडिल, नातेवाईकांना बालविवाह न करण्याची समज दिली. सदर ठिकाणी स्वयंपाक केलेला होता, स्टेज व नवरदेव व नवरीचे नेम प्लेट व आहिरचे भांडीकुंडी ठेवलेली होती. हि कारवाई करत याठिकाणी बालविवाह रोखण्यात यश मिळाले.
हि कारवाई महीला व बालविकास विभागाच्या सदस्य आम्रपाली बोर्डे यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे, कविता गवळी, मोनिका दिवे, सुनिता नागलोद सातारा पोलीस स्टेशनचे बीट मार्शल कर्मचारी यांनी केली आहे.
What's Your Reaction?