जयपूर कोईम्बतूर विशेष रेल्वे एक्स्प्रेसला मुदतवाढ, प्रवाशांना दिलासा...
कोयम्बतूर–जयपूर विशेष एक्सप्रेसला मुदतवाढ; प्रवाशांना दिलासा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) -प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करता आणि गर्दीचा ताण कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या कोयम्बतूर–जयपूर–कोयम्बतूर विशेष एक्सप्रेस गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष गाड्यांचा कालावधी पुढीलप्रमाणे वाढविण्यात आला आहे—
गाडी क्रमांक 06181 (कोयम्बतूर–जयपूर)
सेवा दिवस : गुरुवार
पूर्वीची मान्यता : 19 फेब्रुवारी 2026
मुदतवाढ कालावधी : 26 फेब्रुवारी 2026 ते 26 मार्च 2026
एकूण फेऱ्या : 05
गाडी क्रमांक 06182 (जयपूर–कोयम्बतूर)
सेवा दिवस : रविवार
पूर्वीची मान्यता : 22 फेब्रुवारी 2026
मुदतवाढ कालावधी : 1 मार्च 2026 ते 29 मार्च 2026
एकूण फेऱ्या : 05
या विशेष गाड्यांच्या मुदतवाढीमुळे कोयम्बतूर व जयपूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा लाभ होणार आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात वाढणाऱ्या प्रवासी गर्दीवर यामुळे दिलासा मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही माहिती जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांच्याकडून देण्यात आली आहे.
What's Your Reaction?