परभणी, औरंगाबाद, अहमदनगर,दौंड मार्गे नांदेड हडपसर नांदेड विशेष गाडीच्या 12 फे-या गाडीच्या 12 फे-या मंजूर

 0
परभणी, औरंगाबाद, अहमदनगर,दौंड मार्गे नांदेड हडपसर नांदेड विशेष गाडीच्या 12 फे-या गाडीच्या 12 फे-या मंजूर

परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, दौंड मार्गे नांदेड-हडपसर-नांदेड विशेष गाडीच्या 12 फेऱ्या मंजूर

नांदेड, दि.17(डि-24 न्यूज) उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड- हडपसर-नांदेड विशेष गाडीच्या 12 फेऱ्या मंजूर केल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे –

 नांदेड-हडपसर साप्ताहिक विशेष गाडीच्या 06 फेऱ्या : 

गाडी क्रमांक 07625 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक 22, 29 मे आणि 05, 12, 19 आणि 26 जून, 2024 ला दर बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री 21.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासुर, रोटेगाव, अंकाई, मनमाड, कोपरगाव , अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन मार्गे हडपसर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11.20 वाजता पोहोचेल. ही गाडी मे आणि जून महिन्यात मिळून 06 फेऱ्या पूर्ण करेल. 

हडपसर - नांदेड साप्ताहिक विशेष गाडीच्या 06 फेऱ्या : 

गाडी क्रमांक 07626 हुजूर साहिब नांदेड ते हडपसर विशेष गाडी दिनांक 23, 30 मे आणि 06, 13, 20, आणि 27 जून, 2024 ला दर गुरुवारी हडपसर रेल्वे स्थानकावरून दुपारी 15.15 वाजता सुटेल आणि दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, मनमाड, अंकाई, रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी, पूर्णा मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल. ही गाडी मे आणि जून महिन्यात मिळून 06 फेऱ्या पूर्ण करेल. 

  या गाडीत वातानुकूलित आणि स्लीपर मिळून 22 डब्बे असतील. 

गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow