मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी 75 हजार विद्यार्थी एका सुरात गाणार गीत - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 0
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी 75 हजार विद्यार्थी एका सुरात गाणार गीत - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी 75 हजार विद्यार्थी एका सुरात गाणार गीत

छत्रपती संभाजीनगर, (औरंगाबाद) दि.10 (डि-24 न्यूज)- “जागर दशसूत्रीचा – स्वरगौरव मुक्तीसंग्रामाचा” या घोषवाक्याखाली मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ९ वा. जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी इयत्ता 8 वी ते 12 वीचे जिल्हाभरातील 75000 हून अधिक विद्यार्थी सामूहिक गीत गायन व सांस्कृतिक सादरीकरण करतील, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा शिक्षणाधिकारी(माध्य) श्रीमती आश्विनी लाटकर आदी उपस्थित होते.

 पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली की, बुधवार दि.17 रोजी गोकुळ स्टेडीयम, पोलीस मुख्यालय, ग्रामीण हडको छत्रपती संभाजीनगर येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, तसेच लोकप्रतिनिधी आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

 या दिवशी विद्यार्थी सामूहिक श्रमदान, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तिपर गीते तसेच विविध उपक्रम राबवतील. तसेच मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांच्या बलिदानाची जाणीव करून देत त्यांच्या कार्याचा गौरव विद्यार्थ्यांपुढे ठेवण्यात येईल.

 जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून विद्यार्थ्यांचा सहभाग होणार असून 30,000 विद्यार्थी शहरातून प्रत्यक्ष सहभागी असतील तर प्रत्येक तालुक्यातून 5 हजार या प्रमाणे 45 हजार विद्यार्थी दुरदृष्य प्रणालीने तालुकास्तरावरुन या कार्यक्रमात सहभागी होतील,असे सांगण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow