मालेगाव घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची महीला काँग्रेसची मागणी...

 0
मालेगाव घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची महीला काँग्रेसची मागणी...

मालेगाव घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस महीला आघाडी रस्त्यावर, केली फाशीची मागणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक आणि विकृत प्रकाराने संपूर्ण देश हादरला आहे. फक्त 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिच्या तोंडावर दगड टाकून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी कठोर मागणी होत आहे.

    या अमानुष घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी शहरजिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कु. दिपाली मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले.

महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “ चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे”, “ नराधमाला फाशी द्या”, अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला.

पोलिस प्रशासनाने अतिशय कडक कारवाई करून गुन्हेगाराला त्वरीत फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.

      यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इब्राहीम पठाण, प्रदेश सचिव डॉ. सरताज पठाण, डॉ. पवन डोंगरे, जयप्रकाश नारनवरे, योगेश थोरात, प्रशांत शिंदे, जयपाल दानवे, रेहाना शेख, रुबिना सय्यद, मंजू लोखंडे, चक्रधर मगरे, मोईनोद्दीन कुरेशी, इरफान पठाण, वंदना जगताप, लता अक्षय, निर्मला शिखरे, उत्तम दणके 

रवी लोखंडे, उषा पगारे, शितल देशमुख, मोहम्मद झाकीर, साहेबराव बनकर, अनुराग दाभाडे, संकेत साळवे, नेहा पवार, अलका वंजारे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow