तलाठ्याचा खून करणाऱ्या आरोपिला मोक्का लावून कडक शिक्षा द्यावी, घटनेच्या निषेधार्थ आज कामबंद आंदोलन....!
 
                                तलाठ्याचा खून करणाऱ्या आरोपिला मोक्का लाऊन कडक शिक्षा द्या- तलाठी संघ, तहसीलदार-नायब तहसीलदार संघटना
आजच्या बंदमुळे महसूल विभागातील कामकाज ठप्प झाले..... शासकीय कार्यालयात आज शुकशुकाट होता....
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.29(डि-24 न्यूज) काल वसमत तालुक्यातील कर्तव्यदक्ष तलाठी संतोष पवार हे आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरूने भविष्यात त्यांच्या कौटुंबिक वादाची वाटणी होऊ शकते या शंकेच्या आधारावर त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चाकूने भ्याड हल्ला केला आणि जखमी केले घटनेमध्ये तलाठ्याचा मृत्यू झाला या आरोपिला मोक्का लाऊन कडक शिक्षा द्यावी अशी मागणी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध करत महाराष्ट्र राज्य तहसीलदार-नायब तहसीलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघाने केली आहे.
आज लक्षवेधी बंद आंदोलन करुन घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करुन अशा सामाजिक प्रवृत्तीच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने कठोर कारवाई करुन संबंधितांविरुद्ध मोक्का लावण्याची कारवाई करावी. सर्व शासकीय, अर्धशासकीय कर्मचारी व अधिकारी यांना योग्य तो पोलिस संरक्षण देण्यात यावे. भारतीय दंड विधान कलम 353 अदाखलपात्र केले त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या घटना घडत असल्याची भावना महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना व इतर सर्व शासकीय व अर्धशासकीय संघटनेमधील सर्व सदस्यांनी केली आहे.
या आजच्या बंदमध्ये महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना, चतुर्थश्रेणी संघटना, कोतवाल संघटनेने घटनेचा निषेध करण्यासाठी सहभाग घेतला.
यावेळी महेंद्र गिरगे, परेस खोसरे, डॉ.देविदास जरारे, नितिन गर्जे, सारंग चव्हाण, नवनाथ ज-हाड, एन.जे.वाकोडे, सुरेश करपे, विद्याचरण कडवकर, जितेंद्र जाधव, सचिन वाघमारे, ज्ञानेश्वर मोहिते, वैजिनात विधोतेकर, सौ.दिना पुरी, शेख आसिफ, एस.गायके, सौ.एस.शिंदे, नागेश बरसमवार, डि.पि.कराळे, अजिनाथ तिळेकर, संतोष लोळगे, सुधाकर मोरे, ज्ञानेश्वर लोधे आदी उपस्थित
 
 
होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            