जिल्ह्यात 238 गावात टँकरने पाणीपुरवठा, जिल्हाधिका-यांनी घेतला पाणीटंचाईचा आढावा

 0
जिल्ह्यात 238 गावात टँकरने पाणीपुरवठा, जिल्हाधिका-यांनी घेतला पाणीटंचाईचा आढावा

टंचाई आढावा

संवेदनशीलतेने राबवा उपाययोजना -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणूकीचे कामकाज सुरु असतांना जिल्ह्यात निर्माण होत असलेली टंचाईची परिस्थिती हाताळून राबवावयाच्या उपाययोजना ह्या संवेदनशीलतेने राबवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज यंत्रणेस दिले.

जिल्ह्यातील टंचाई स्थिती, त्यावरील उपाययोजना याबाबत जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज तालुकानिहाय आढावा दुरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. जिल्हा मुख्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी अर्चना खेतमाळीस, निलेश घोडके, तहसिलदार पल्लवी लिगाडे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आदी सहभागी झाले होते.

टंचाई स्थितीबाबत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात सध्या २३८ गावे, ४५ वाड्यामध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. १६८ गावांमध्ये १९१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात २२.५४ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्प १६ आहेत त्यात ९.१० टक्के जलसाठा आहे, तर लहान प्रकल्प ९७ आहेत त्यात १३.६५ टक्के जलसाठा आहे. असे एकूण ११४ प्रकल्पांमध्ये २०.७९ टक्के जलसाठा आहे.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, टंचाई निवारण कामांसाठी आचारसंहितेचा अडथळा नाही. त्याबद्दल निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. टॅंकरचे प्रस्ताव संवेदनशीलतेने मंजूर करावे. रोजगार हमी योजनेची कामे सुरु ठेवावी. जास्तीत जास्त मजूरांना कामांवर सामावून घ्यावे. या कालावधीत पाणी स्रोतांचे बळकटीकरण करण्याची कामे घेण्यात यावी. लोकांना पाणी बचतीचे महत्त्व सांगावे. पाणीस्रोतांचे बाष्पीभवन प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्या. पुनर्भरणासारखे उपक्रम राबवावे. निवडणूक कालावधी असला तरी टंचाई निवारण उपाययोजनांकडे लक्ष द्यावे व ग्रामस्थांना दिलासा द्यावा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow