खैरेंना इम्तियाज जलील यांच्या शुभेच्छा, म्हणाले निवडणूक विकासाच्या मुद्यावर व्हावी....!

 0
खैरेंना इम्तियाज जलील यांच्या शुभेच्छा, म्हणाले निवडणूक विकासाच्या मुद्यावर व्हावी....!

खैरेंना इम्तियाज जलील यांच्या शुभेच्छा, म्हणाले निवडणूक विकासाच्या मुद्यावर व्हावी....!

औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी चंद्रकांत खैरे यांना मिळाली. खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना शुभेच्छा दिली आहे. लोकसभेची निवडणूक हि विकासाच्या मुद्यावर झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हिंदू -मुस्लिम, हिरवा-भगवा, खान पाहिजे की बान हे मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात न वापरता प्रतिस्पर्धी शत्रु न मानता लोकशाहीच्या या पर्वाला साजेशी पारदर्शक निवडणूक व्हायला पाहिजे. जनतेमध्ये जाऊ, कोण जिंकणार कोण हरणार याला महत्त्व नाही जनताच निर्णय घेईल कोण निवडून येणार. आम्ही जनतेमध्ये जाऊन प्रचार करणार निर्णय जनतेला घ्यायचा आहे कोण खासदार पाहिजे अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow