अचानक मुस्लिम युवक हजारोंच्या संख्येने का उतरले रस्त्यावर...

अचानक मुस्लिम युवक हजारोंच्या संख्येने का उतरले रस्त्यावर...
कानपूरच्या घटनेतील युवकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी, गुन्हे मागे घेतले नाही तर शहर बंद करण्याचा इशारा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) - अचानक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दिल्लीगेट येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास हजारो युवकांचा जमाव जमा झाल्याने खळबळ उडाली. हातात "आय लव मोहंमद" चे बॅनर हातात घेऊन युवकांनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणाचेही नेतृत्व या मोर्चाला नसताना हजारोंचा जनसमुदाय एकच मागणी करत होता कानपूर जिल्ह्यातील एका घटनेत मुस्लिम 20 ते 25 युवकांवर गुन्हे दाखल करुन अटक केली यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. त्या युवकांनी बॅनरवर "आय लव मोहंमद" लिहिण्याच्या कारणावरून युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा कोणता न्याय आहे हा प्रश्न विचारला जात आहे. प्रेषित मोहंमद पैगंबर हे श्रध्दास्थान आहे. जगासाठी त्यांनी शांततेचा संदेश दिला आहे त्यांचे नाव बॅरवर लिहाणे गुन्हा आहे का...? प्रत्येकाला संविधानाने आपल्या धर्माचे पालन, प्रचार प्रसाराचा अधिकार दिले असताना बॅनरवर हा उच्चार करने गुन्हा आहे का...असा सवाल हे युवक योगी सरकारला विचारत होते. त्या युवकांवरील गुन्हे उत्तर प्रदेश सरकारने परत घ्यावे नसता शहर बंद करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. शांततेत हा मोर्चा दुपारी तीन वाजता पैठण गेट येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. हा मोर्चा पैठण गेट ते गुलमंडी, सिटीचौक, किले अर्क मार्गे अण्णाभाऊ साठे चौक नंतर विभागीय आयुक्त कार्यालय येथे धडकला. दोन तास येथे एकीकडचा रस्ता बंद करावा लागला येथे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी रस्ता मोकळा केला. कानपूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला अशी माहिती यावेळी फैसल खान व शेख सलिम यांनी माध्यमांना दिली. तत्पूर्वी आझाद चौक येथे या घटनेच्या निषेधार्थ आझाद चौक येथे मतीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. मुस्लिम बहुल भागात काही युवकांनी "आय लव मोहंमद" चे बॅनर लावले. विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर फैसल खान, शेख सलिम, अश्फाक कुरेशी, शेख मतीन, फराज खान, शफीक शेख, मुजाहीद खान यांची सही आहे.
What's Your Reaction?






