सोशल मीडियावर महीलेला अश्लील कमेंट करणारा पोलिसांच्या ताब्यात...!

सोशल मीडियावर अश्लील कमेंट करणारा पोलिसांच्या ताब्यात...!
ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याची कामगिरी...
वैजापूर, दि.8(डि-24 न्यूज)- विवाहाची अॅनिवर्सरी निमित्ताने शुभेच्छापर परिवाराने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामध्ये सदर फोटोवर आरोपी याने बनावट इन्स्टाग्रामवर खाते तयार करुन त्या विवाहित जोडी यांचे फोटोच अश्लील कमेंट करुन त्यांची बदनामी केली. सदर बदनामीस कंटाळून जोडप्याने सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे व पथकाने कसून तपास करुन बनावट इन्स्टाग्राम खात्याची माहिती प्राप्त करून तांत्रिक विश्लेषण करत बनावट खाते आरोपी नामे सागर जगदाळे, राहणार वैजापूर याने बनावट खाते बनवून अश्लील कमेंट केल्याचे कबूल केले.
गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, सफौ कैलास कामठे, संतोष तांदळे, दत्ता तरटे, गणेश घोरपडे, सविता जायभाये, मुकेश वाघ, राजेश राठोड, शितल खंडागळे, पुजा म्हस्के, सायबर पोलीस ठाणे व अजित नाचन यांनी कार्यवाही यशस्वी केली.
सायबर पोलिसांनी सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा, कोणत्याही संशयास्पद संदेशावर विश्वास ठेवू नका. अनोळखी व्यक्तीशी फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नका असे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?






