चंपा चौक ते दमडी महेल रोडवरील 20 अतिक्रमणे जमीनदोस्त...

 0
चंपा चौक ते दमडी महेल रोडवरील 20 अतिक्रमणे जमीनदोस्त...

चंपा चौक ते दमडी महल रोडवरील 20 अतिक्रमणे जमीनदोस्त...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)-आज महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने जिन्सी चंपा चौक ते रवींद्र नगर भूमी अभिलेख कार्यालय या रस्त्यावर मोठी अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली.

 महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन सेंटर नाका परिसरातील जीसी चंपा चौक ते पुढे रवींद्र नगर दमडी महल भूमी अभिलेख कार्यालयापर्यंत एकूण २० अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम चंपा चौक येथील हॉटेल तुबा डावी आणि उजवी बाजू तसेच हॉटेल बुशरा व त्याच्या बाजूला ताज दरबार या चार ते पाच हॉटेल चालकांनी रस्त्यावर पादचारी मार्गावर मोठे शेड तयार केले होते.त्या खाली बिर्याणी चिकन मटन विक्री करत होते.

 याबाबत त्यांना मागील आठ दिवसापासून वेळोवेळी समज देण्यात येत होती तरी त्यांनी प्रशासनाला जुमानले नाही यामुळे आज त्यांचे ते शेड सर्व साहित्यसह जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी त्यांचे बरेच नुकसान झाले त्यांनी विनंती केली पण त्यांची विनंती अमान्य करण्यात आली.

 हॉटेल बुशरा ही हॉटेल चहासाठी खूप फेमस आहे रात्री आठ वाजेपासून तर दहा ते अकरा वाजेपर्यंत चक्क पूर्ण रोडवर दुचाकी गाड्या उभ्या राहतात आणि नागरिक खुल्या रस्त्यावर उभे राहून हॉटेलमध्ये बसून चहा चा आस्वाद घेता यामुळे पूर्ण ट्राफिक होते आज कारवाई करण्यापूर्वी याच रस्त्यावरील रुग्णवाहिका जात असता त्यास मोकळा रस्ता नव्हता मनपाच्या पथकाने सर्व वाहनांना भोंग्या द्वारे सूचना देऊन सर्व वाहने बाजूला हटवून त्या रुग्णवाहिकेला जागा करून दिली.

पुढे चंपाचौक या ठिकाणी दोन नागरिकांनी बकरा मटन विक्री आणि मांडा विक्री यांचे तंदूर लावले होते .ते पुढे एका अतिक्रमणधारकांनी सरकारी नळ च्या जागेवर नळ कट करून त्या ठिकाणी दहा बाय दहाचे शटर लावून बांधकाम केले होते त्याला ही सूचना देण्यात आली होती. सदर व्यक्तीला नोटीस न देता सदर अतिक्रमण पाडणार आणि गुन्हा दाखल करणार अशी सूचना देण्यात आली होती.यामुळे आज सदर अतिक्रमण धारकाने आज सहकार्य करून पूर्ण साहित्य काढले शेड काढले आणि बांधकाम जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केले. पुढे याच प्रकारचे तीन शेड केले निर्माण केले होते ते काढण्यात आले यापुढे एकूण सहा ते सात दुकानदारांनी रस्त्यावर शेड केले होते आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.आज त्यांनी स्वतःहून पूर्ण अतिक्रमण काढून घेतले.सदर कारवाई आज पश्चिम बाजूने संपली असून पूर्व बाजूने उद्या कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे .मा.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांचे मार्गदर्शनानुसार प्रभाग क्रमांक तीन चे सहाय्यक आयुक्त नईम अन्सारी , अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद ,संजय सुरडकर, रवींद्र देसाई नागरी मित्रपथक प्रमुख प्रमोद जाधव व कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतला अशी माहिती अतिक्रमण विभागाने दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow