जनता दलचे जेष्ठ नेते अजमल खान यांचे निधन, आज दुपारी दफनविधी

 0
जनता दलचे जेष्ठ नेते अजमल खान यांचे निधन, आज दुपारी दफनविधी

जनता दलचे नेते अजमल खान यांचे निधन...!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.29(डि-24 न्यूज) जनता दलचे जेष्ठ नेते तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रस्थानी असणारे व्यक्तिमत्त्व अजमल खान यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले आहे. त्यांचे वय अंदाजे 70 होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शहागंज येथील त्यांच्या निवासस्थानी मान्यवरांनी गर्दी केली. शेवटच्या श्वासापर्यंत माजी पंतप्रधान एच.डि.देवेगौडा यांच्या जनता दल(एस) पक्षात एकनिष्ठ काम केले. स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्राफ, स्व.रफीक झकेरिया तथा अनेक दिग्गज नेत्यांसोबत अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग असे. शेतकऱ्यांचे प्रश्न असो सामान्य नागरिकांचे व सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ख्याती त्यांच्यामध्ये होती. रोखठोक बोलण्याची सवय त्यांच्या स्वभावात होती. इतिहास व सांस्कृतिक व साहित्याची त्यांना आवड होती. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान होते.

त्यांच्या पत्नी गेल्यावेळी शहागंज वार्डातून एमआयएमच्या तिकीटावर नगरसेविका निवडून आले होते. त्यांचे सुपुत्र डॉ.अफजल हे हि पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.

अजमल खान यांची नमाज -ए-जनाजा दुपारी 1.45 वाजता शहागंज येथील बडी मस्जिद येथे अदा केली जाईल तर दफनविधी पिर गैब साब दर्गाह कब्रस्तानात होईल अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow