थकीत मालमत्ता कराच्या व्याजात कोणतीही सुट मिळणार नाही - प्रशासक जी.श्रीकांत यांचे सुतोवाच

 0
थकीत मालमत्ता कराच्या व्याजात कोणतीही सुट मिळणार नाही - प्रशासक जी.श्रीकांत यांचे सुतोवाच

थकीत मालमत्ता कराच्या व्याजात कोणतीही सुट मिळणार नाही-

प्रशासक यांचे सूतोवाच

न्यायालयीन कारवाई टाळण्यासाठी त्वरित मालमत्ता कर भरा...

मनपाचे नागरिकांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उप आयुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा हद्दीत थकीत निवासी व व्यावसायिक मालमत्ता कर वसुली मोहीम सातत्याने प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या सर्व झोन मधून मालमत्ता धारकांना नोटीस क्र.4 ते 5 बजावूनही नागरिकांनी याला प्रतिसाद दिला नसल्यामुळे नाईलाजास्तव महानगरपालिकेला लोक अदालती मध्ये प्रकरणे दाखल करावे लागले आहेत.

सर्व झोन कार्यालय मिळून आतापर्यंत 8253 पैकी 4882 नोटीस वाटण्यात आलेल्या आहेत. उर्वरित नोटिसा या आठवड्यात वितरीत केल्या जाणार आहेत. या नोटीस पैकी 533 लोकांनी मालमत्ता कराचा भरणा केला आहे. यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यंत 7 कोटी 53 लाख मालमत्ता कर प्राप्त झाला आहे. यात निवासी मालमत्ता धारकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे अशी माहिती कर विभागाकडून देण्यात आली आहे.

    या बाबत कोणास काही आक्षेप असल्यास त्यांनी तात्काळ सबंधित झोन कार्यालयाशी संपर्क साधावा.

मालमत्ता कराच्या व्याजात कोणतीही सूट मिळणार नाही

   

  महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना वारंवार थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टी भरणा करणे करिता आवाहन करण्यात येत आहे. या नंतरही मोठ्या प्रमाणावर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला नाही. मालमत्ता कराच्या व्याजात कोणतीही सूट मिळणार नाही असे आयुक्त तथा प्रशासक महोदयांनी स्पष्ट केले आहे.

   याबाबत प्राप्त माहिती नुसार लोक अदालती मध्ये प्रकरण दाखल झाल्यानंतर रक्कम न भरल्यास सबंधित मालमत्ता जप्त होऊ शकते. अकाऊंट सिज होऊ शकते. नोटीस तमिल झाल्यानंतर रकमेचा त्वरित भरणा केला नाही तर सबंधित विरुद्ध समन्स तामील होऊ शकतात. प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयीन प्रक्रिया टाळण्यासाठी नागरिक पैसे भरत आहेत. याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

मालमत्ता धारकाची तक्रार झोन कार्यालयातच ऐकून घ्या प्रशासक यांचे निर्देश...

  लोक अदालत मध्ये नोटीस दिलेले काही मालमत्ता धारकांना तुम्हाला नोटीस कोर्टातून आली आहे तिथेच जाऊन भेटा असे झोन कार्यालय मधून सांगितले जात आहे. या पुढे मालमत्ता धारकांची तक्रार/आक्षेप झोन कार्यालयातच ऐकून घेऊन लेखी अर्ज असल्यास तो स्वीकारून तो निकाली काढून संबंधिताला कळवावे. नागरिक लोक अदालत प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन तेथे अर्ज सादर करत आहेत यामुळे त्यांचे कामात अडथळा निर्माण होत आहे ही बाब गंभीर स्वरूपाची आहे असे प्रशासक महोदय यांनी सर्व सहायक आयुक्त व वसुली कर्मचारी यांना कडक शब्दात सुनावले आहे. या पुढे झोनमध्ये आलेल्या नागरिकांना विधी प्राधिकरणाकडे जाण्यास सांगू नये असे त्यांनी बजावले आहे.

   तरी निवासी व व्यवसायिक मालमत्ता धारकांनी आपल्याकडील थकीत मालमत्ता कराचा भरणा त्वरित करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow