नालेसफाई व कचरा व्यवस्थापन कामांची पाहणी, तात्काळ कामांना सुरुवात...
नालेसफाई व कचरा व्यवस्थापन कामांची पाहणी; तात्काळ कामांना सुरुवात...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) -शहरातील नालेसफाई व कचरा व्यवस्थापनाची कामे प्रभावीपणे राबविण्यासाठी सभापती, स्थायी समिती श्री. अनिल सुमंत्र श्रीकिशन मकरिये यांनी विविध झोनमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली.
झोन क्र. 5 व 6 मधील नालेसफाई तसेच कचरा व्यवस्थापनाच्या कामांचा आढावा घेताना त्यांच्या समवेत सदस्य श्री. सुनिल जगताप, श्रीमती कमलताई रामभाऊ नरोटे तसेच श्रीमती प्रियांका दीपक खोलेकर उपस्थित होते.
तसेच झोन क्र. 7 मध्येही सभापती श्री. मकरिये यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या पाहणीदरम्यान गलिच्छ वस्ती सुधार समिती सभापती श्री. जालिंदर शेंडगे, स. सदस्य श्रीमती अनिताताई किशोर मानकापे, श्री. नंदलाल गवळी तसेच श्रीमती अर्चनाताई शेलार निळकंठ उपस्थित होते.
या सर्व कामांना दि. 8 एप्रिल 2026 पासून तात्काळ सुरुवात करण्यात आली असून, शहरातील स्वच्छता व जलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले
.
What's Your Reaction?