महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांची केली आरोग्य तपासणी...
महानगरपालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ तसेच आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून महानगरपालिका, आरोग्य विभाग व आय.एम.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने दिनांक 08 एप्रिल 2026 रोजी आयोजित शिबिरामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील झोन क्रमांक 4, 5 व 6 मधील 253 सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच, आतापर्यंत झोन क्रमांक 1 ते 6 मधील एकूण 396 सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.
या उपक्रमात महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी तसेच आय.एम.ए.मधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये खालीलप्रमाणे तपासण्यांचा समावेश होता
फिजिशियन तपासणी – 119 रुग्ण
उच्च रक्तदाब (Hypertension) – 38
मधुमेह (Diabetes) – 5
नेत्ररोग तपासणी – 158 रुग्ण
मोतीबिंदू – 5
इतर नेत्ररोग – 158
त्वचारोग तपासणी – 14 रुग्ण
अस्थिरोग तपासणी – 51 रुग्ण
छातीचे एक्स-रे (Chest X-ray) – 106
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत लाभार्थी – 42
ABHA कार्ड नोंदणी – 177
रक्त तपासणी – 566
उर्वरित झोननिहाय आरोग्य तपासणी पुढीलप्रमाणे आयोजित करण्यात येणार आहे:
दिनांक 09 एप्रिल 2026 रोजी झोन क्रमांक 7, 8, 9 व 10 मधील सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
या शिबिराद्वारे सफाई कर्मचारी यांच्या आरोग्याची नियमित तपासणी होऊन त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी आय.एम.ए चे डॉ. नवल मालू, डॉ. प्रशांत दरख, डॉ. यशवंत गाडे, डॉ. कराड, डॉ. संकलेचा, डॉ. सूरज जाधवर, डॉ. बालाजी मुंढे, डॉ. अदित्यकुमार जोशी, डॉ. स्नेहा नरवडे, श्री. बाशीद (नेत्रतज्ञ सहाय्यक) लायन्स क्लब यांचे नेत्रतज्ञ सहाय्यक इत्यादी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी वरील शिबीर यशस्वी करण्यासाठी कार्य केले.
What's Your Reaction?