उद्यापासून आमखास मैदानावर फॅमिली फेस्टची चार दिवस मेजवानी

उद्यापासून आमखास मैदानावर फॅमिली फेस्ट, फुड स्टाल्सची मेजवानी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) शहरवासीयांच्या सेवेत उद्यापासून ऐतिहासिक आमखास मैदानावर फॅमिली फेस्टची चार दिवसांसाठी मेजवानी मिळणार आहे. संपूर्ण फॅमिलीसाठी एका छताखाली फॅमिली फेस्ट, स्कुल गॅदरींग, हज, उमराह, घर व विविध वस्तूंच्या खरेदीसाठी, काॅमर्स, टु व्हिलर, फुड स्टाल्स, लहान मुलांच्या खेळासाठी नियोजन आयोजकांनी केले आहे. उद्यापासून हे फॅमिली फेस्ट सुरू होणार आहे शहरवासीयांनी कुटुंबासह येथे भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुध्दा येथे शिकण्यासाठी खूप काही आहे. उद्या 30 जानेवारी 2025 दुपारी 12 वाजेपासून हे सुरू होणार आहे रात्री दहा वाजेपर्यंत येथे भेट देऊ शकता. उद्या सायंकाळी 5.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते केले जाईल. 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत फॅमिली फेस्ट सुरू राहणार आहे.
What's Your Reaction?






