कटकट गेट, हत्तेसिंगपुरा येथे जमीन बळकावण्याचा प्रयत्न, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल...

कटकट गेट, हत्तेसिंगपुरा येथे जमीन बळकावण्याचा प्रयत्न, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- कटकट गेट, हत्तेसिंगपुरा येथे मृत्यूनंतर खोटा हिबानामा(दानपत्र) तयार करून जमीन बळकावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर सहा आरोपींच्या विरोधात फसवणुकीचा जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुल रहीम अब्दुल करीम, मो.रहीम अब्दुल करीम, मो.अली अब्दुल रहीम, नदीम अब्दुल रहीम, मो.समी अब्दुल रहीम, मो.काशिफ अब्दुल रहीम आरोपींची(राहणार हत्तेसिंगपुरा, अल फरहान काॅलनी, छत्रपती संभाजीनगर) नावे आहेत.
सय्यद शकील सय्यद नियाज, राहणार खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर हे या प्रकरणी फिर्यादी आहे. त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची हत्तेसिंगपुरा भागात 8 गुंठे क्षेत्रफळाची जमीन आहे. त्यापैकी 3 हजार 410 चौ.फुट जागा त्यांच्या नावे नोंदवली आहे. 13 मार्च 2023 रोजी शकील हे जमीनीत गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून हि जमीन आमची आहे असे सांगून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करत आहेत.
सविस्तर माहिती अशी तक्रारदाराचे वडील सय्यद नियाज अब्दुल रज्जाक यांचे निधन 18 फेब्रुवारी 2018 साली झाले. आरोपींनी 11 महीने उलटल्यानंतर 3 जानेवारी 2019 रोजी त्याच व्यक्तीच्या नावाने नोटीरी करुन खोटा हिबानामा तयार केल्याचे तपासात समोर आले आहे. हा हिबानामा दाखवून त्यांनी जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
What's Your Reaction?






