दिवाळीपूर्वी थकीत मानधन व पोषण आहार देयकाची मागणी, अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन...

 0
दिवाळीपूर्वी थकीत मानधन व पोषण आहार देयकाची मागणी, अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन...

दिवाळीपूर्वी थकीत मानधन व पोषण आहार देयकाची मागणी...

आयटकप्रणीत अंगणवाडी सेविका व मदनिसांचे धरणे आंदोलन... 

ऐन दिवाळीत बेमुदत धरणे व पिठलं भाकरी आद्नोलानाचाही दिला इशारा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.8(डि-24 न्यूज)- दिवाळीपूर्वी थकीत मानधन व पोषण आहार देण्याच्या मागणीकडे जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ आज 4 तालुक्यातील आयटकप्रणीत अंगणवाडी सेविका व मदनिसांचे प्रातिनिधिक स्वरूपात धरणे आंदोलन झाले. महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ.मंगल पांचाळ यांना निवेदन देऊन थकीत वेतन व देयके न मिळाल्यास ऐन दिवाळीत 20 ऑक्टोबर पासून बेमुदत धरणे देऊन पिठलं भाकरी आंदोलानाचाही आयटकने आज इशारा दिला आहे.

कन्नड तालुक्यातील वडनेर बीट मधील सुमारे 70 कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी 2023 चे थकीत मानधन तसेच इतर काही जणींचे थकीत मानधन दिवाळीच्या आत देण्यात येईल तसेच वैजापूर, फुलंब्री सह इतरही तालुक्यातील पोषण आहाराची देयके देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे डॉ.पांचाळ यावेळी म्हणाल्या. प्रोत्साहन भत्ता सर्वांना मिळाला नाही, निवृती लाभ सर्वांना दिला नाही, लाडकी बहीण योजनेच्या कामाचे पैसे थकीत आहेत, मोबाईल रिचार्जचे पैसे दिलेले नाहीत याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले.

जि.प.समोर सुमारे 4 तास चाललेल्या या धरणे आंदोलनात कॉ.प्रा.राम बाहेती, कॉ.तारा बनसोडे, कॉ.शीला साठे, कॉ.शालिनी पगारे,.बेबीडीडोरे, सुनिताशेजवळ, कॉ.सीमा व्यवहारे, कॉ.जयश्री धिवरे, कॉ.रंजना राठोड, अलका दिडोरे, लताजाधव, शोभा तांदळे, कॉ.मंगल पाटणकर आदीसह सुमारे 150 अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow