अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर सोबत यावे - अॅड प्रकाश आंबेडकर

समाजाचे प्रश्न सोडवायचे असेल तर वंचित घटकांची सत्ता हवी - अॅड प्रकाश आंबेडकर
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) -
वंचित असलेल्या समाजाचे प्रश्न कमी न होता वाढतच आहे. हे प्रश्न सोडवायचे असेल तर वंचित घटकांनी एकजूट दाखवून सत्ता मिळवली तरच प्रश्न सुटतील. प्रस्थापितांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सध्याच्या सरकारला सत्तेपासून दुर करण्यासाठी एकजुट दाखवावी. मुस्लिम समाज धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येतात परंतु जेव्हा त्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी साथ मिळत नाही असे मोठे विधान आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले.
हज हाऊस येथील सभागृहात वंचितचे प्रवक्ते तय्यब जफर यांच्या उपस्थितीत "शतरंज-ए-हयात" या उर्दु पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात आंबेडकर बोलत होते.
अल्पसंख्यांक समाजावर अन्याय अत्याचार वाढत आहे. संविधान बदलण्याचे प्रयत्न केले जात आहे. माॅब्लिंचिंकच्या घटनेत निष्पापांचा बळी घेतला जात आहे. आंबेडकर हे वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सतत समाजात भाईचारा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. प्रत्येक समाज घटकाला राजकारणात प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत आहे. असे वक्तव्य कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी केले. नवतरुण लेखक तय्यब जफर यांनी युवकांना आवाहन केले समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात यावे. तिरंगा झेंडा हातात घेवून यावे एका विशिष्ट समाजाचा झेंडा हातात घेवून प्रश्न सुटणार नाही तर वाढतच राहतील असे कळकळीचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ उर्दु साहित्यिक असलम मिर्झा उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती जेष्ठ उर्दु साहित्यिक डाॅ.इर्तेकाज अफजल, नुरुल हसनैन, प्राचार्य मगदुम फारुकी, मौलाना मोईजोद्दीन फारुकी, इंजि. मोहंमद वसील, संपादक नायाब अन्सारी, प्रो.काझी नवीद सिद्दीकी, अमित भुईगळ, सिध्दार्थ मोकळे, जावेद कुरेशी, फारुख अहेमद, अफसरखान, फिरदौस फातेमा, वाहेद फारुकी व्यासपिठावर उपस्थित होते. सुत्र संचालन अबुबकर रहेबर यांनी केले तर आभार जावेद कुरेशी यांनी मानले. कार्यक्रमानंतर मुशायराचे आयोजन केले होते.
What's Your Reaction?






