पोलिस उप अधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना राष्ट्रपती पदक जाहीर

 0
पोलिस उप अधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना राष्ट्रपती पदक जाहीर

पोलिस उप अधीक्षक विजयकुमार ठाकुरवाड़ यांना राष्ट्रपती पदक जाहीर

औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील कार्यरत उपविभागीय पोलीस अधिकारी व सहा. पोलीस उप निरीक्षक यांना गुणवत्तापूर्वक उत्कृष्ट पोलीस सेवे करिता राष्ट्रपती पदक जाहिर

पोलीस दलातील गुणवत्तापूर्वक उत्कृष्ट सेवा करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांचे सेवेच्या अभिलेखानुसार भारताचे राष्ट्रपती यांचे द्वारे राष्ट्रपती पोलीस पदक हे दरवर्षी प्रजास्ताक दिनाचे औचित्याने जाहिर करण्यात आले आहे.

या अनुषंगाने ग्रामीण जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले श्री. विजयकुमार नरसिंगराव ठाकुरवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग कन्नड म्हणुन सध्या कार्यरत आहेत. सरळ सेवेद्वारे ते सन 1993 मध्ये पोलीस उप निरीक्षक म्हणुन पोलीस दलात ते भरती झाले आहेत. सन 1995 ते 1999 या वर्षात त्यांनी गोंदीया जिल्ह्यातील चिंचगड या नक्षलग्रस्त प्रभावी भागात सेवा केली आहे. यादरम्यान त्यांनी प्रभावी पणे नक्षल सर्च ऑपरेशन राबवुन 4 नक्षली व्यक्तींना त्यांच्या शस्त्र व गोळादारु सह अटक करून नक्षलांचे तळ उध्वस्त करण्यात महत्वाची भुमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी तालुका जालना येथे असतांना क्लिष्ट असा खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपी अटक करण्यात आले आहेत. तसेच अंबड, भोकरदन, तालुका जालना, मोजपुरी या पोलीस ठाण्यास असतांना दरोडया सारख्या गुन्हयाचा यशस्वी पणे तपास करून आरोपी निष्पन्न करून जेरबंद केले आहेत.

या त्यांच्या 31 वर्षाच्या पोलीस सेवे करिता अतिउत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना विशेष सेवा पदक तसेच आंतरिक सुरक्षा सेवा पदक त्याच प्रमाणे पोलीस महासंचालक यांचे सन्माचिन्हांने सुध्दा त्यांना यापुर्वी गौरविण्यात आले आहे.

याचप्रामणे श्री शहबाज खान दिलावर खान पठाण, सहा. पोलीस उप निरीक्षक, मोटर परिवहन शाखा येथे नियुक्त असुन ते जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणुन सन 1992 भरती झालेले असुन गुणवत्तापुर्वक सेवे करिता त्यांना यापुर्वी पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. सेवा कालावधी मध्ये त्यांना 310 बक्षिसे देण्यात आलेली आहेत.

त्यांनी गुणवत्तापूर्वक उत्कृष्ट सेवेची 31 वर्षे पूर्ण केलेली आहेत.

पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow