आरएसएसच्या कार्यालयावर वंचित काढणार जन आक्रोश मोर्चा...

 0
आरएसएसच्या कार्यालयावर वंचित काढणार जन आक्रोश मोर्चा...

आरएसएसच्या कार्यालयावर वंचित काढणार जन आक्रोश मोर्चा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) - आरएसएसच्या सदस्य नोंदणीला विरोध करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडीचे अध्यक्ष राहुल मकासरे यांच्या सह 8 आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने वंचित बहुजन आघाडी अक्रामक झाली आहे. एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी व मनुवादी विचारसरणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी फुले -शाहु आंबेडकर विचारसरणीच्या समर्थनार्थ जन आक्रोश मोर्चा 24 ऑक्टोबर 2025 सकाळी 11 वाजता आरएसएसच्या बाबा पेट्रोल पंप येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत वंचितचे नेते अमित भुईगळ यांनी दिली आहे.

या मोर्चाला सर्व फुले -शाहु आंबेडकरी संघटना व राजकीय पक्ष विचारसरणीच्या लोकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद पश्चिमचे युवा आघाडीचे अध्यक्ष राहुल मकासरे यांनी शासकीय पाॅलिटेक्निक महाविद्यालयासमोर परवानगी नसताना उभारलेल्या संघाच्या सदस्य नोंदणीला विरोध केला होता. मकासरे व यांच्यासह इतर 8 लोकांविरुद्ध कलम 189(2), 190, 299, 296, 352(2) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल मकासरे यांच्यावर कोणताही हिंसाचार, सामाजिक अशांतता सार्वजनिक हानी केली नसतानाही अजामिनपत्र आरोप लावले आहे या घटनेच्या निषेधार्थ हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अमित भुईगळ यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow