कटकट गेट, बाबर काॅलनी येथे जन्मदात्या पित्याचा मुलाने खून केल्याने खळबळ, आरोपी फरार...
कटकट गेट येथे मुलाने केला बापाचा निर्घृणपणे खून, आरोपी फरार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - कटकट गेट, बाबर काॅलनीच्या बाबा बेकर्स मध्ये काम करणाऱ्या पश्चिम बंगाल येथील जन्मदात्या मुलाने बापाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. लाकडी दांड्याने झोपेत असलेल्या बापाच्या डोक्यात मारुन खून केल्याची माहिती जीन्सी पोलिसांनी दिली आहे. आरोपी खून करुन फरार झाला आहे पोलिस त्याचा शोध घेत आहे. खूनाचे कारण काय पोलिस याचा शोध घेत आहेत. काही संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेत पिता शेख मती यांचा मृत्यू झाला आहे. शेख मती यांना जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी मुलगा अजीऊल शेख मती , वय 19, राहणार बाबर काॅलनी, कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर हा फरार झाला आहे.
शाहिन शेख मती शेख, वय 23 , व्यवसाय मजूरी, राहणार फत्तेपुर, बोरवा पोलिस ठाणे, जिल्हा मुशाराबाद(पश्चिम बंगाल) हे.मु.बाबार काॅलनी, कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादी झोपेतून उठून फ्रेश होण्यासाठी बाथरुममध्ये गेलो त्यावेळी फिर्यादीचे वडील झोपलेले होते व भाऊ अजीऊल शेख हा झोपेतून उठून बेडवर बसलेला होता. त्यानंतर साधारण 7.15 ते 7.30 वाजेच्या दरम्यान फिर्यादी हे बाथरुममधून बाहेर आलो व पाहिले असता फिर्यादीचे वडील मती शेख हे अंथरुणावर पडलेले होते व त्यांच्या डोक्यातून रक्त निघत होते व तेथेच एक लाकडी दांडा पडलेला दिसला व भाऊ अजीऊल शेख हा तेथून पसार झाला. यातील आरोपीने तात्कालिन कारणावरून फिर्यादीचे वडीलांच्या डोक्यात लाकडी दांडा मारुन जीवे ठार मारले. पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांनी गुन्हा दाखल करुन तपास करत आहेत.
What's Your Reaction?