दिवाळीच्या काळात अतिक्रमण हटाव मोहिम स्थगित करा, माजी आमदार संजय केनेकर यांची मागणी...!

 0
दिवाळीच्या काळात अतिक्रमण हटाव मोहिम स्थगित करा, माजी आमदार संजय केनेकर यांची मागणी...!

दिवाळीच्या काळात अतिक्रमण हटाव मोहीम तात्पुरती स्थगित करा; माजी आमदार संजय केणेकर यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)- दिवाळीच्या सणासुदीच्या काळात गोरगरीब नागरिक, छोटे व्यावसायिक, हातगाडीधारक आणि फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा विचार करून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम तात्पुरती स्थगित करावी, अशी मागणी करणारे निवेदन महापौर समीर राजुरकर व महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांना सादर करण्यात आली.

दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि उत्साहाचा सण आहे. मात्र, याच काळात शहरातील अनेक छोटे व्यावसायिक, हातगाडीधारक, फेरीवाले आणि कष्टकरी नागरिक आपल्या छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी धडपडत असतात. या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा वर्षभराचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि इतर मूलभूत गरजा अवलंबून असतात.

अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यास त्यांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होऊन अनेक कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहू शकते.

विशेषतः बहुजन समाजातील कष्टकरी, गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा विचार करता, त्यांच्या छोट्या व्यवसायांचे कंबरडे मोडणारी परिस्थिती निर्माण होऊ नये. कारण या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हा त्यांच्या जगण्याचा प्रमुख आधार आहे.

“दिवाळी प्रत्येकाच्या घरात आनंदाचा दिवा पेटवणारा सण आहे; तो कोणाच्याही घरातील चूल विझवणारा ठरू नये,” या भावनेतून ही मागणी करण्यात आली आहे.

शहराच्या विकासाला आणि स्वच्छतेला निश्चितच महत्त्व आहे; मात्र विकासाच्या प्रक्रियेत समाजातील सर्वात शेवटच्या घटकाच्या जगण्याचा आधार हिरावला जाणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

या मागणीमागे कोणताही राजकीय हेतू नसून माणुसकी, सामाजिक सलोखा आणि गोरगरीबांच्या हिताचे रक्षण करण्याची भावना आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दिवाळीच्या काळात अतिक्रमण हटाव मोहीम तात्पुरती स्थगित ठेवावी आणि सणासुदीच्या काळात या कष्टकरी घटकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही विनंती करण्यात आली.

“सण सर्वांचा, आनंद सर्वांचा आणि दिवाळीही सर्वांची! गोरगरीबांच्या चेहऱ्यावरील हास्य टिकवणे, त्यांच्या चुली पेटत्या ठेवणे आणि त्यांच्या कष्टाचा सन्मान करणे, ही

च खरी लोकसेवा!”

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow