गावठी कट्टा(पिस्टल) बाळगणारा आरोपी जेरबंद, ग्रामीण पोलिसांची कारवाई...!
गावठी कट्टा(पिस्टल) बाळगणारा आरोपी जेरबंद, ग्रामीण पोलिसांची कारवाई...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगरकडे जाणारा रोडवर भेंडाळा गावात राधाकृष्ण हाॅटेल समोर एक इसम हा अवैधरित्या गावठी कट्टा(पिस्टल) घेवून उभा आहे. अशी खात्रीलायक माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना मिळाली. त्यावेळी गुन्हे शाखेची एक टिम पोलिस ठाणे गंगापूर हद्दीत भेंडाळा फाटा येथे घरफोडी गुन्ह्याचा तपास करत होती. पथकाने किशोर शिवनाथ जाधव, वय 28, राहणार अब्दुलपूर, तालूका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला 40 हजार रुपये किंमतीची एक गावठी कट्टा (पिस्टल) मॅग्झिनसह ज्याच्या मुठीला दोन्ही बाजूने काळ्या रंगाच्या पट्ट्या असलेला जुने वापरते, एक हजार रुपये किंमतीचे एक पिवळ्या रंगाचे जीवन काडतूस जुने वापरते असा एकूण 41 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याचे विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गंगापूर पोलिस करत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोउपनि महेश घुगे, पोह कासिम शेख, सचिन राठोड, सुमीत गोरे, बलबिरसिंग बहुरे, शिवाजी मगर यांनी केली आहे.
What's Your Reaction?