बेशिस्त वाहनचालकांवर कार्यवाई, 6 लाख 64 हजार रुपये दंड वसूल...

 0
बेशिस्त वाहनचालकांवर कार्यवाई, 6 लाख 64 हजार रुपये दंड वसूल...

बेशिस्त 966 वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई...

6 लाख 64 हजारांचा दंड वसूल...

छत्रपती संभाजीनगर, दि.11(डि-24 न्यूज)- 

शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत अवघ्या काही तासांत राँग साईडने वाहन चालविणाऱ्या 966 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 6 लाख 64 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती शहर वाहतूक शाखचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांनी बुधवार, 10 जून रोजी दिली. दरम्यान, ई-चलानपासून बचाव करण्यासाठी बनावट नंबरप्लेट वापरणाऱ्या एका कारचालकाचा पर्दाफाश झाल्याने त्याच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार वाहतूक विभागाने शहरातील प्रमुख चौकांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविली. मोंढा नाका, सिटी चौक, सेव्हन हिल, आकाशवाणी चौक, एपीआय कॉर्नर, हायकोर्ट सिग्नल, सेशन कोर्ट सिग्नल, मिलिंद चौक, नगर नाका, महावीर चौक, ओअॅसिस चौक आणि वाळूज गाव परिसरात तपासणी करण्यात आली. या काळात वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या चालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या मते, राँग साईडने वाहन चालविणे हे शहरातील वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच गंभीर अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहे. त्यामुळे अशा चालकांविरोधात नियमितपणे विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow