राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय एक्टिव्ह मोडमध्ये, योजना होणार अधिक गतिमान...!
अल्पसंख्याक आयुक्तालय एक्टिव्ह मोडमध्ये, योजना होणार अधिक गतिमान
उद्यापासून मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळात कर्ज प्रकरणाचे ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार...मार्टी प्रशिक्षण संस्थेसाठी जागेचा शोध सुरू... आमखास मैदानावर अथवा हर्सुल येथे होणार जागा निश्चित, राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तांची माहिती...
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज), राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी अल्पसंख्याक आयुक्तालयाची निर्मिती शासनाने केली आहे. आता सर्व राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना एका छताखाली आले आहे. राज्यातील 31 जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी एकूण 974 कोटींच्या निधीची मान्यता आहे यामध्ये केंद्र सरकारचा 120 कोटींचा वाटा आहे. अगोदर स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित नसल्याने 60 टक्के निधी खर्च होत होता आता आयुक्तालयाची निर्मिती झाल्याने योजना अधिक गतिमान होणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला शासनाने मान्यता दिली आहे लवकरच हि पदे भरण्यात येणार आहेत. आयुक्तालयासाठी 36 व राज्यासाठी 85 अधिकारी व कर्मचारी भरतीसाठी शासनाने मान्यता दिली आहे. कर्मचारी भरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अतिरिक्त पदभार किंवा प्रतिनियुक्तीवर कारभार सुरू आहे. आयुक्तालय इमारत, वक्फ बोर्ड कार्यालय व मार्टी प्रशिक्षण संस्था रेसिडेन्शियल उभारण्यासाठी जागेचा शोध घेतला जात आहे. आमखास मैदानावर अथवा हर्सुल येथे जागा निश्चित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मायनाॅरीटी रिसर्च एण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट(मार्टी) रेसिडेन्शिअल व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभारणीसाठी पंतप्रधान जनविकास कार्यक्रम अंतर्गत 125 कोटींचे अर्थसहाय्य मिळावे यासाठी प्रस्ताव नोट करण्यात आला आहे. उच्च शिक्षण व पिचडी व विविध कोर्सेस साठी विदेशात शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रती विद्यार्थी 40 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची शासनाने तरतूद केली आहे. प्रोफेशनल कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना 25 हजार शिष्यवृत्ती वाढवून 50 हजार रुपये केली आहे. अन्य कोर्स करण्यासाठी 5 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जात आहे. उद्यापासून अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना (विद्यार्थी अर्ज वर्षभर करु शकतात), मुदत कर्ज योजना, सुक्ष्म पतपुरवठा योजना, डॉ.ए.पि.जे.अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेचे अर्ज 21 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत भरण्यासाठी शुभारंभ करण्यात येणार आहे. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत राज्याचे अल्पसंख्याक आयुक्त मोईन ताशिलदार यांनी दिली आहे.
What's Your Reaction?