जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी केले होमहवन, शहर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू

 0
जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी केले होमहवन, शहर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू

जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी केला होमहवन

औरंगाबाद, दि.31(डि-24 न्यूज) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवशंकर कॉलनीतील सायली हॉटेल जवळ सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी आज साखळी उपोषण सुरू करण्यात आले, तसेच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत चांगली राहावी, व वेळ काढू पणाचे धोरण राबविणाऱ्या सरकारला सुबुद्धी द्यावी, यासाठी होम हवन करण्यात आले. यावेळी संजय शिंदे यांनी सहपत्निक पूजा केली. या आंदोलनात गोरख सोनवणे, अरुन पवार , अनिल थोटे, अॅड योगेश फाटके, राजू पवार, आप्पासाहेब शेजुळ, दादासाहेब गायकवाड, उद्धव शिंदे, बाळू मोकाशी समाज बांधव सहभागी झाले होते.

क्रांती चौकात मराठा बांधवांनी केले गाजर आंदोलन...

शहर व जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने ढवळून निघाले आहे. ठिकठिकाणी आंदोलने शांततेत सुरू आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजे एसटी बससेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांचे हाल होत आहेत. जळगाव, जालना, बीड कडे जाणारी एसटी बससेवा पूर्णपणे ठप्प आहे. जळगाव रोड, सिल्लोडकडे येणारे व जाणारी सर्व प्रकारच्या वाहने इकडून तिकडे जाऊ शकली नाही, दिवसभर रस्त्यावर आंदोलने सुरू होती. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. 

 मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने क्रांती चौक येथे उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गणेश उगले पाटील व विजय काकडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी गाजर आंदोलन करत क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी व समाज बांधवांनी शासनाचा निषेध केला. गाजर देणाऱ्या या सरकारचं करायचं काय खाली मुंडके वर पाय., मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय., कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही., एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow