एमजीएम संघाने जिंकले एम्पलाॅय टि-20 स्पर्धेचे विजेतेपद...

एम्प्लोई टी-20 क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण
एम जी एम संघाने जिंकले विजेतेपद...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) - महानगरपालिकेच्या वतीने आयोजित एम्प्लोई टी-20 क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. एम जी एम संघाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून माहे मे 2025 मध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल येथे एम्प्लॉय टी 20 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अधिकारी /कर्मचारी यांनी आपल्या कामाच्या तणावातून मुक्त राहावे व आपले कौशल्य खेळाचे मैदानावरही दाखवावे हा या मागील उद्देश होता. या स्पर्धेत एकूण 16 संघानी सहभाग घेतला होता.स्पर्धेतील अंतिम सामना एम जी एम विद्यापीठ व शहर पोलिस संघ या दोन संघा दरम्यान झाला होता यात एम जी एम संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले.
महानगरपालिका मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या संघाला बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्या संघास 51000/ धनादेश , विजेता चषक व उप विजेत्या संघाला चषक, 31000/ धनादेश बक्षीस देण्यात आले.
तसेच उत्कृष्ट फलंदाज पांडुरंग वाघमोडे शहर पोलिस संघ यांना 2500/ रुपयांचा धनादेश , उत्कृष्ट गोलंदाज अमोल उदावंत मनपा क्रिकेट संघ यांना 2500/ व मॅन ऑफ द सिरीज डॉ.राहुल राजपूत एम जी एम संघ यांना 2500/ रुपयांचा धनादेश देण्यात आला.
सदरील कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त नंदकिशोर भोंबे, क्रीडा अधिकारी संजीव बालया, शहर पोलिस संघाचे कर्णधार शेख आसिफ, पांडुरंग वाघमोडे ,बाबासाहेब काडे, व इतर कर्मचारी तसेच एम जी एम संघाचे कर्णधार सागर शेवाळे ,राहुल राजपूत, डॉ. अमरसिंह इत्यादी खेळाडू उपस्थित होते.
यावेळी तांत्रिक समितीचे सदस्य आसिफ सिद्दिकी, फिरोज पठाण ,सुंदर खरात यांचेही पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त म्हणाले की भविष्यात या स्पर्धेला अधिक चांगले व दर्जेदार स्वरूप देऊन आयोजित करावी. यावेळी त्यांनी विजेत्या व उप विजेत्या संघाला तसेच इतर विजेत्या खेळाडूंना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमांचे सूत्र संचालन स्पर्धा सचिव सय्यद जमशेद यांनी केले तर आभार प्रवीण चव्हाण यांनी मानले.
What's Your Reaction?






