"पर्यावरण वाचवा" हा संदेश देणारी सायक्लोथाॅन भव्य सायकल रॅली संपन्न

“पर्यावरण वाचवा” हा संदेश देणारी “ सायक्लोथॅान” भव्य सायकल रॅली संपन्न.
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) नवीन छत्रपती संभाजी राजे श्री गणेश महासंघ व छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटनेच्या वतीने पर्यावरण वाचवा हा संदेश देणार भव्य सायकल रॅली गजानन मंदिर येथून प्रारंभ झाली. सायकल रॅलीचे उद्घाटन माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी झेंडा दाखवून सुरूवात केली.
सदरील रॅली गजानन महाराज मंदीर, सेव्हन हिल, क्रांती चौक, गोपाल - टी, पदमपुरा, व्हीट्स हॅाटेल, गाडे चौक, दर्गा चौक, सूतगिरणी चौक मार्गे गजानन महाराज मंदीर चौक येथे सांगता झाली. रॅलीत सहभागींना गणेश महासंघातर्फे टी-शर्ट, प्रमाणपत्र, मेडल व बक्षिस देण्यात आले. या रॅलीमध्ये 110 सायकलपटूंनी सहभाग नोंदविला.
भव्य सायकल रॅलीचे आयोजक श्री गणपती महासंघाचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे, संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे, नरेश पाखरे, अजय डिडोरे, सोनू पाईकडे, सोनू मगरे व जिल्हा सायकल संघटनेचे सचिव चरणजित सिंग संघा, सहसचिव अतुल जोशी, डॉ दीपक कुंकूलोळ उपस्थित होते.
यार रॅलीमध्ये आशिष अस्वर, प्रशांत मिरखेळकर, प्रो चांगदेव माने, राम पाटील, प्रसाद जोशी, श्रीकांत ढगे, नीता, सदानंद नागपूरकर, प्रफुल्ल मोहरील, अनिल सुलाखे, नागेश गव्हले, पोपट आळंजकर, आकाश परदेशीं, बाबासाहेब सूर्यवंशी, शुभम शिंदे, साहिल आहेर, मोहन उन्नले, अजय पांडे, यशोधन गाडेकर, अनिल देशमुख, अनंत ढवळे, संदीप शिंदे, तेजस सोनाळकर, कमलेश पवार, पांडुरंग लहाने, मुकेश शेडमकर, रवींद्र जोशी, सतीश अनवेकर, स्टेल्ला उरईल, आकाश टाके, सुनील कोंडेवार, सुहास आंबेकर, संतोष हिरेमठ, अमोल सोमवंशी, नरेंद्र भालेराव, विजय मानकर, यरिश मानकर, चैतन्य मानकर, पराग लीगडे, श्रीनिवास लीगडे, आशिष कळंब, रुहन पथक, अथर्व कुलकर्णी, संकेत गुप्ता, संजय महाजन,अंकुश भीमराव केदार, अण्णा थोरात, अमोल जगताप , जयंत सांग्वीकार, विशाल आढावे, तेजल आढावे विजय पाटोदी सायकलपटूंनी सहभाग नोंदविला.
What's Your Reaction?






