मराठवाड्याच्या विकासासाठी मान्यवरांची बैठक संपन्न
मराठवाड्याच्या विकासासाठी मान्यवरांची बैठक संपन्न
छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) मराठवाड्याच्या हक्काच्या विकासासाठी मराठवाडा विकास फेडरेशनच्या वतीने बुद्धिजीवी मान्यवरांची एक व्यापक बैठक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक व शेषराव चव्हाण यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. सदरची बैठक ज्योतीनगर येथे विलास चंद्र काबरा यांचें निवासस्थानी संपन्न झाली.
या प्रसंगी बोलताना शेषराव चव्हाण म्हणाले की, मराठवाड्याचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत त्यामुळे काही महत्वाच्या विषयावर एकाग्र करून प्रश्न मार्गी लावणे महत्वाचे असुन या पुढील काळात शाश्वत उत्पन्न देणारी शेती, रोजगारी निर्मितीचे विवीध विषय आणि शहरी पिण्याचे पाणी व सिंचना साठीचे पाणी या वर विचार विनिमय झाला. मार्जीनल फार्मर या विषयावर सखोल चर्चा होऊन तीन एकर किंवा कमी अधिक शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शास्वत उत्पन्न मिळू शकतील असे उपाय शेषराव चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
या प्रसंगी चर्चेत सहभागी होताना विलासचंद्र काबरा म्हणाले की, निवडक विषयावर कार्यरत होऊन परिणामकारक कार्य अधिक जोमाने करता येइल त्या मुळे शेती, रोजगार व पाणी व्यवस्थापन या क्षेत्रात विकासा च्या दृष्टिने कार्य अधिकची गती देऊ शकेल. शिवनाथ राठी बोलतांना म्हणाले की, मराठवाडा विकास फेडरेशन च्या वतीने हाती घेतलेल्या उपक्रमाचे स्वागत करून मराठवाड्या तील अनेक मान्यवर व तज्ञ यांना सुध्दा या उपक्रमात सहभागी करून घ्यावे म्हणजे महत्वाचे व विविध अंगाने वाटचाल करने सोपे जाऊ शकेल. शंकर शिंदे यांनी शेतकरी वर्गाला मिळणारे अत्यल्प उत्पन्न हाच खरा शेतकरी वर्गाचा समस्यांचा प्रश्न असुन या वर्गाला न्याय मिळवुन देण्यासाठी त्यांच्या आर्थिक फायदा कसा होईल या साठी नियोजनाची नितांत आवश्यकता असल्याचे नमुद केले. गंगा प्रसाद दासरी शेती साठी सिंचन करावयाचे पाणी याचे व्यवस्थापन मराठवाड्याच्या प्रगतीला अधील गतिमान करेल असे नमुद केले. या चळवळीस अधिक गतिमान करण्यावर सर्वच मान्यवरांनी भर दिला. प्रकाश बाबुराव काळे यांनी शेतकऱ्यांना दिशादर्शक आणि अधिकचे वाढीव उत्पन्न कसे मिळेल यावर उपयुक्त नियोजन उपक्रम मराठवाडा विकास फेडरेशनने हाती घ्यावा असे प्रतिपादन केले.
शहरातील पिण्याचे पाणी वक्तशीर व मुबलक मिळावे म्हणून अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी त्रुटी वर व्यवस्थापन करण्याच्या आग्रह धरला.
मराठवाडा विकास फेडरेशनच्या या महत्त्वपुर्ण बैठकीस शेषराव चव्हाण, शिवनाथ राठी, राजेंद्र दाते पाटील, प्रकाश बाबुराव काळे, शंकर काळे, गंगाप्रसाद दासरी, सुनिल चव्हाण, विजय वाघमारे या सह अनेकांचा सहभाग होता. बैठकीच्या शेवटी विलास चंद्र काबरा यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
What's Your Reaction?