एमआयएमने वंचितचे उमेदवार अफसरखान यांना पाठिंबा द्यावा

 0
एमआयएमने वंचितचे उमेदवार अफसरखान यांना पाठिंबा द्यावा

एमआयएमने वंचितचे उमेदवार अफसर खान यांना पाठिंबा द्यावा 

वंचित बहुजन आघाडीचा खासदार इम्तियाज जलील यांना टोला 

अफवा एमआयएमने पसरवण्याचा केला आरोप 

औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) खासदार इम्तियाज जलील हे 5 वर्षांपूर्वी वंचित बहुजन आघाडी मुळेच निवडून आले खासदार म्हणून त्यांनी कोणतेही काम केले नाही त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे आता एमआयएमने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांना पाठिंबा द्यावा असा टोला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन यांनी आज शनिवारी एका पत्रकार परिषदेत खासदार इम्तियाज जलील यांना लगावला.

 ते पुढे म्हणाले पक्षनेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर हे अकोला येथील निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळे एबी फॉर्म देण्यास उशीर झाला परंतु एमआयएमने वंचितची खेळणी असल्याचा आरोप केला त्यावर वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले यावेळी बोलताना उमेदवार अफसर खान म्हणाले मला वंचित बहुजन आघाडीने 20 दिवसांपूर्वीच उमेदवारी जाहीर केली होती. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या व्यग्रतेमुळे ‘एबी फॉर्म’ उशिराने मिळाला. त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. एमआयएम पक्षाचा अकोला मतदारसंघात पाठिंबा मिळविण्यासाठी वंचितची ही खेळी नव्हती. उलट ‘एमआयएम’ने न मागता आंबेडकरांना शहागंज येथील जाहीर सभेत पाठिंबा दिला. कारण ‘वंचित’च्या पाठिंब्याशिवाय आपण जिंकू शकत नाही याची त्यांना खात्री आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी केली. 

अकोला लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांना ‘एमआयएम’ने पाठिंबा जाहीर केला होता. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवाराच्या विरोधात ‘वंचित’ने मुस्लिम उमेदवार उभा केल्याचे पडसाद अकोल्यात उमटले होते. त्यातून अफसर खान यांनी अपक्ष लढत असल्याचे जाहीर केले. अकोल्यातील मतदानाच्या दिवशी अफसरखान खान यांना दुपारी ‘वंचित’ने ‘एबी फॉर्म’ दिला. ही ‘वंचित’ची राजकीय खेळी असल्याचा आरोप ‘एमआयएम’ने केला. तर अफसर खान यांना ‘वंचित’ची उमेदवारी मिळाली नसल्याची शहरात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत खान यांनी स्पष्टीकरण दिले. ‘मी वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे. आंबेडकर यांच्या व्यग्रतेमुळे अर्ज उशिरा मिळाला. मागच्या दाराने अर्ज भरलेला नसून माझ्यावरील व पक्षावरील आरोप निराधार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळेत अर्ज दाखल केला. त्यापूर्वी अपक्ष आणि पक्षाचा असे दोन अर्ज दाखल केले होते’, असे खान म्हणाले. 

‘वंचित’च्या पाठिंब्यावर ‘एमआयएम’ला गेल्या निवडणुकीत विजय मिळाला होता. त्यांच्या पायाखालची वाळू निसटली आहे. आमची टक्कर महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या सोबत आहे तर इम्तियाज जलील हे चौथ्या क्रमांकावर राहतील 4 जूनला जेव्हा परिणाम येतील बघावे असा दावा त्यांनी केला. एमआयएम हा जातीयवादी पक्ष असून हिंदू-मुस्लिमात तेढ वाढविण्यासाठी त्यांना सुपारी मिळते हे सर्वांना ठावूक आहे’, अशी टीका खान यांनी केली. 2019 ची निवडणूक जिंकल्यानंतर विधानसभा निवडणुकीत खोके घेऊन वंचितसोबतची युती तोडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

त्यांनी जलिल यांच्यावर बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप केला. औरंगाबाद नामांतरावर अफसरखान यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले निवडून आल्यास ऐतिहासिक औरंगाबादचे नाव जशाचे तसे करण्यासाठी संसदेत आवाज बुलंद करु. पाण्याचा प्रश्न व बेरोजगारी दुर करण्यास प्राधान्य दिले जाईल. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष योगेश बन, तय्यब जफर, जावेद कुरैशी रवी रत्नपारखे पि.के. दाभाडे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow