छावणी अग्नितांडवातील मृत्यूला कोण जावाबदार, लोकप्रतिनिधींनी केली चौकशीची मागणी
छावणी अग्नितांडवातील मृत्यूला कोण जावाबदार, लोकप्रतिनिधींनी केली चौकशीची मागणी
घटनास्थळी पालकमंत्री संदीपान भुमरे, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आमदार संजय सिरसाट, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, वंचितचे नेते अफसर खान यांनी भेट दिली.
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) आज पहाटे छावणीत भीषण आगीच्या घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनानंतर छावणीतील कब्रस्तानात सायंकाळी साडेसात वाजता मृतकांचा शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला.
घटनास्थळी आमदार, खासदार, राजकीय नेत्यांनी भेट देत घाटी रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली व घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आगीच्या दुर्दैवी घटनेला प्रशासनाचा गलथान कारभार जवाबदार असल्याचे म्हटले व घटनेची सखोल चौकशीची मागणी केली आहे. अग्निशमन दलाला घटनास्थळ लवकर सापडले नाही. उशीराने पोहोचल्याने जीवीतहानी झाली. घटनेतील हुतात्म्यांना त्यांनी श्रध्दांजली दिली.
पोलिस आयुक्त मनोज लोहिया काय म्हणाले....
लोहिया यांनी सांगितले छावणीतील असलम टेलर यांचे मुख्य बाजारपेठेत हे दुकान आहे. पोलिसांना 4.15 वाजता माहिती मिळाली. आग दुसऱ्या मजल्यावर गेली नाही पण धुरात गुदमरून जिवितहानी झाली आहे. आगीमुळे दोन मुले, दोन पुरुष, तीन महीला अशा सात जणांचा मृत्यू झाला आहे. आग नेमकी कशामुळे लागली चौकशीत समोर येईल.
खासदार इम्तियाज जलील काय म्हणाले....
दुर्देवी घटना घडली आहे. धुरामुळे मृत्यू झाला यामध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. एकाच घरातील सदस्य मरण पावले. अग्निशमन दल उशिरा आले. सिढी लाऊन वर चढत नव्हते. पाणी नव्हते, ते कधी आले काॅल कधी गेला. तपासण्याची गरज आहे. येथील नागरिकांचा आरोप आहे. शवविच्छेदनानंतर कळेल मृत्यू कशामुळे झाला. या घटनेची सखोल चौकशी पोलिस आयुक्त व मनपा आयुक्तांनी करावी.
प्रत्यक्षदर्शी सोहेल शेख काय म्हणाले....
रात्री 2.45 वाजता घरी आलो. डोळे लागले असेल. तेवढ्यात गल्लीतील मुलांनी आरडाओरडा करत आग लागल्याचे सांगितले. पहिला मजला जळत होता. दुसरा मजला धुराने व्यापून गेला होता. आम्ही आवाज देऊन त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद आला नाही. अखेर धुर वाढत गेला. आगीचे चटकेही बसत होते. आम्ही बाजूच्या इमारतीवरून खाली उतरलो.
ताहा खान, नागरिक....
मी 4 वाजता आलो होतो तेव्हा अग्निशमन दल आले होते. ते पाणी मारत होते.
परंतु आग नियंत्रणात येत नव्हती. फायर ब्रिगेडचा एक जण शिडीवरून वर गेला. खाली उतरला. ते फक्त खालून पाणी मारत होते. वरच्या घरात जात नव्हते. त्यानंतर मी त्याच शिडीवरून वर गेलो. पाहीले तर तिथे मृतदेह पडलेले होते. काच फोडून आत गेलो. दोन लहान मुलांना बाहेर काढले. तोपर्यंत फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी दुसरी सिडी लावली. त्यावरून एक वरिष्ठ कर्मचारी वर आले. त्यांच्या हातात मी एका मुलाला दिले.
दुकान व घरमालक, शेख असलम काय म्हणाले....
पहाटे सव्वातीन वाजता आग लागल्याचे कळाले. आम्ही वरच्या कुटुंबातील लोकांना खाली येण्यासाठी आवाज दिला. मात्र ते उठले नाही. माझे कपडे व टेलरिंग चे दुकान आहे. ई-वेहिकल चार्जिंग वर होती. मात्र त्यामुळे आग लागली असती तर बॅटरी व गाडी जळाली असती. मात्र तसे झाले नाही. या गाडी मुळे आग लागली नाही तर शाॅर्टसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज आहे. असे घरमालक यांनी सांगितले.
What's Your Reaction?