उज्वला गॅस योजनेत अपहार करुन फसवणूक केल्याचा आरोप, हर्सुल पोलिस ठाण्यात तक्रार

 0
उज्वला गॅस योजनेत अपहार करुन फसवणूक केल्याचा आरोप, हर्सुल पोलिस ठाण्यात तक्रार

उज्वला गॅस योजनेत अपहार करुन फसवणूक केल्याचा आरोप, हर्सुल पोलिस ठाण्यात तक्रार

औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) इंदिरानगर बायजीपूरा येथे गरजूंना उज्वला गॅसचे कनेक्शन देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. येथील समाजसेवक इम्रान खान अयूब खान यांनी कॅम्पचे आयोजन केले होते. ज्या लाभार्थ्यांनी अर्ज भरले होते त्या लाभार्थ्यांच्या नावावर दुसरेच फायदा घेत असल्याचे उघड झाले आहे. म्हणून हर्सुल येथील एका गॅस एजन्सीने फसवणूक केल्याने संबंधितांलर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे अशी लेखी तक्रार हर्सुल पोलिस ठाण्यात इम्रान खान अयूब खान, लियाकत अहेमद शहा, अलिम शेख, सय्यद अजम, फारुख शेख, राबीयाबी बशीर कुरेशी यांनी दिली आहे.

तक्रारीत म्हटले आहे 7 लाभार्थ्यांच्या नावावर उज्वला गॅसचे कनेक्शन मिळाले व दुसरेच व्यक्ती यांचा लाभ घेत आहेत. कॅम्पसमध्ये ज्या गरजूंनी अर्ज भरले त्यांच्या नावाने दुसरेच फायदा घेत आहे यामुळे एजंसी चालकांची सखोल चौकशी करून परवाना रद्द करण्यात यावा शासनाची फसवणूक केल्याने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. लाभार्थ्यांचे नावाची यादी व लाभ घेणाऱ्यांची नावे तक्रारीत देण्यात आली आहे.

तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पोलिस आयुक्त यांना पाठवली असल्याची माहिती डि-24 न्यूजला इम्रान खान यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow