बार असोसिएशन इंडस्ट्रीतील लाॅयर्सच्या अध्यक्षपदी अॅड प्रकाश शिंदे, सचिवपदी अॅड पराग शहाणे
बार असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल लॉयर्स च्या अध्यक्षपदी ॲड. प्रकाश शिंदे आणि सेक्रेटरी पदी ॲड. पराग शहाणे यांची बिनविरोध निवड.
औरंगाबाद,दि.16 (डि-24 न्यूज) कामगार व औद्योगिक न्यायालय औरंगाबाद येथे कामगार कायद्यामध्ये काम करणाऱ्या बार असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल लॉयर्स या वकील संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली व या सर्वसाधारण सभेत वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. प्रकाश शिंदे आणि सचिव म्हणून ॲड. पराग शहाणे यांची 2024 या वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. याच सर्व साधारण सभेत बार असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल लॉयर्स या वकील संघाची नवीन कार्यकारिणी सुद्धा बिनविरोध निवडण्यात आली. सदर कार्यकारणीत उपाध्यक्ष पदी ॲड. एस.एस. कुलकर्णी, महिला उपाध्यक्ष पदी (नामनिर्देशित) सौ. मंजुषा आंबेकर व सहसचिव म्हणून ॲड. नितीन ढोबळे यांची निवड झाली. वकील संघाचे कोषाध्यक्ष म्हणून ॲड. अविनाश काटकर आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून ॲड. प्रदीप ढवळे व सांस्कृतिक विभाग सचिव म्हणून ॲड. गजानन तेलंग्रे यांची निवड करण्यात आली व कार्यकारणीचे इतर सभासद म्हणून ॲड. भाग्येश पारनेरकर व ॲड. बाळू शिंदे यांची निवड करण्यात आली. बार असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल लॉयर्स या वकील संघाची झालेली निवडणुंक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर सभेला वकील संघाचे सर्व ज्येष्ठ व इतर सभासद उपस्थित होते. सदर निवडणुकीनंतर येत्या वर्षात अनेक नवीन कार्यक्रम वकीलसंघातर्फे आयोजित करण्यात येतील अशी माहिती वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. प्रकाश शिंदे व ॲड. पराग शहाणे यांनी दिली.
What's Your Reaction?