पत्रकार संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात उद्या क्रांतीचौकातून...!

 0
पत्रकार संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात उद्या क्रांतीचौकातून...!

पत्रकार संवाद यात्रेच्या दुसर्‍या टप्याची वृत्तपत्र दिंडीने सुरूवात 

छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात 13 ऑगस्ट रोजी होणार

छ. संभाजीनगर(औरंगाबाद),12(डि-24 न्यूज ) लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दि.28 जुलैपासून सुरू झाली आहे. दुसर्‍या टप्याची सुरूवात छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथून 13 ऑगस्ट रोजी वृत्तपत्र दिंडीने होणार आहे. ऐतिहासिक क्रांती चौकातून सकाळी 10 वाजता यात्रेला सुरूवात होईल. त्यावेळी वृत्तपत्रे विक्रेते, संपादक, पत्रकार व विविध सामाजिक राजकीय संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभु गोरे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वृत्तपत्र व पत्रकारांच्या मागण्या सरकारला सांगण्यासाठी आणि राज्यभरातील पत्रकारांच्या विषयावर जनजागृती करण्यासाठी दिक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा 28 जुलै पासून सुरू झाली आहे. पहिल्या टप्यात विदर्भ, खान्देश, उत्तर महाराष्ट्रातील पंधरापेक्षा अधिक जिल्ह्यातुन या यात्रेने प्रवास केला आहे. पत्रकारांचा आणि विविध सामाजिक संस्थांचे मोठे समर्थन यात्रेला मिळाल्याने पत्रकारांच्या या यात्रेचे वादळ घोंगावू लागले आहे. दुसर्‍या टप्यातील यात्रेचा शुभारंभ 13 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक क्रांती चौकातून होणार असुन मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, पुणे, कोकण, ठाणे विभागातून ही यात्रा 20 ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्रालयावर जाणार आहे. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सहभागाने वृत्तपत्र दिंडी निघणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्यासह सरचिटणीस डॉ.विश्‍वास आरोटे, कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, राज्य समन्वयक संतोष मानुरकर, विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी उपस्थित राहणार आहेत. तर यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघाचे पदाधिकारी सदस्य आणि विविध सामाजिक राजकीय संस्थांचे प्रतिनिधी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या शुभारंभाला जास्तीत जास्त पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे, वर्तमानपत्र विकेता संघटनेेचे जिल्हाध्यक्ष नीलेश फाटके, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शांताराम मगर, उपाध्यक्ष छबूराव ताके, संघटक विलास शिंगी, महानगर अध्यक्ष अनिल सावंत, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, प्रसिद्धी प्रमुख मनोज पाटणी, वर्तमान पत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष काकासाहेब मानकापे, सचिव गणेश भोसले, कार्याध्यक्ष शेख फईम, उपाध्यक्ष अण्णासाहेब जगताप, प्रसिद्धी प्रमुख भीमराव वायभट, शिवाजी ढेपले यांनी केले आहे.

वर्तमानपत्र विक्रेता संघटनेच्या सहभागाने वृत्तपत्र दिंडी

पत्रकार संवाद यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर वर्तमानपत्र विक्रेता संघटनेच्या सहभागाने वृत्तपत्र दिंडीने होणार आहे. या वृत्तपत्र दिंडीत सर्वच वर्तमानपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपादक, वृत्तपत्र विक्रेते, पत्रकार, राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरीकांचा सहभाग राहणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow