सरकारचे कान, डोळे उघडे असतील तर 20 तारखेला सामोरे येईल- वसंत मुंडे

सरकारचे कान, डोळे उघडे असतील तर 20 तारखेला सामोरे येईल - वसंत मुंडे
छ. संभाजीनगरातून पत्रकार संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा वृत्तपत्र दिंडीने प्रारंभ
छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.13(डि-24 न्यूज) वृत्तपत्र विक्रेते आणि वर्तमान पत्रात काम करणाऱ्या लोकांकडेसुद्धा मते आहेत हे तुम्ही बघणार आहात का नाही, हा सवाल विचारण्यासाठी ही यात्रा आहे, क्रांती चौकातून या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत असताना मी आव्हान करतो की, सरकारचे कान, डोळे उघडे असतील तर येत्या 20 तारखेला पत्रकार संवाद यात्रेला सरकार सामोरे येईल आिण पत्रकार, वर्तमान पत्र विक्रेत्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मंजूर करण्याची भूमिका घेईल, असे थेट आव्हान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दिक्षाभूमी ते मंत्रालय या पत्रकार संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातून मंगळवार, दिनांक 13 ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून निघालेल्या पत्रकार संवाद यात्रेतील वृत्तपत्र दिंडीच्या उद्घाटन प्रसंगी वसंत मुंडे बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री खा. डॉ. भागवत कराड, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यसचिव डॉ. विश्वासराव आरोटे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी आदींची उपस्थिती होती.
यावेळी पत्रकार संघाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोेरे यांनी प्रास्ताविक केले.
पुढे बोलताना वसंत मुंडे म्हणाले की, सर्वसामान्य माणसांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी व लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सर्व प्रसार माध्यमे व त्यामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचे संरक्षण व त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकार संवाद यात्रेमागील भूमिका विषद करताना प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे पुढे म्हणाले की, या देशातील लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी तसेच पत्रकारांच्या हक्कासाठी तसेच पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी, वैचारिक घुसळण होण्यासाठी व सर्वसामान्य माणसांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी या देशातील चौथास्तंभ व त्यात काम करणारे सर्व पत्रकार यांचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत. यासाठी पत्रकारांच्या प्रश्नावर केवळ चर्चा करून भागणार नाही तर त्यांचे प्रश्न सरकार दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न या पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून आपण करणार आहोत.
यावेळी मनपा उपायुक्त रवींद्र जोगदंड, कुलस्वामीनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे, शिवसेना ठाकरे गटाचे नारायण जाधव, मेडिकल असोसिएशनचे रोशन शिंदे, कमलेश मंडोरे आदींनी वसंत मुंडे यांचा सत्कार करत पत्रकार संघाच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
यावेळी पत्रकार संघाचे महानगर अध्यक्ष अनिल सावंत, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शांताराम नगर, विलास शिंगी, छबूराव ताके, मुकेश मुंदडा, मनोज पाटणी, सुधीर कोर्टीकर, संजय व्यापारी, संदीप घंटे, सतीश पाटील, सुधाकर जेठे, समाधान वाणी, सचिन उबाळे, अतुल खंडगावकर, अभय विखणकर, शिवाजी आस्वार, रमेश कोंदलकर, गणेश भोसले, आरेफ देशमुख , अखलाक देशमुख, अनिस रामपूरे, शेख जाकेर, शेख मुख्तार, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अण्णासाहेब जगताप, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष निलेश फाटके, मानकापे मामा, गणेश भोसले, माणिक कदम, भीमराव व्हायभट, अमोल धामणे, राम काळे, राधाकृष्ण कुलकर्णी, घुगे, श्रमिक वर्तमानपत्र विक्रेते संघटना महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगरचे प्रा. शिवाजीराव ढेपले, प्रकाश वाघ, विष्णू कावळे, विष्णू ढाकणे, पुंडलिक भोसले, रामकृष्ण राऊत राजीव, गायकवाड, विठ्ठल पारटकर, मनोज बोराडे अंबादास कोल्हे, संजय काथार तसेच राहुल मकासारे, शेख शेफिक, सुजित ताजने, श्री संत सावता महाराज भजनी मंडळाचे ह.भ. प. माधव महाराज इतरवाड आदींसह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.
पत्रकारांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून 20 लाखपर्यंत कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करणार : डॉ. भागवत कराड
वृत्तपत्र दिंडी सकाळी साडेअकरा वाजता क्रांती चौक येथून निघाली असता खासदार भागवत कराड यांनी भाग घेऊन त्यांनी पत्रकार, विक्रेते यांच्या घरांसाठी मागण्या तत्काळ मांडणार असून कोविडसारख्या महाभयंकर रोगात मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या वारसांना आर्थिक मदत व सहकार्य करण्यासाठी मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार अाहे. पत्रकारांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून 20 लाखपर्यंत कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची त्यांनी सांगितले.
ढोल ताशांच्या गजरात व टाळ मृदंगाच्या निनादात निघालेल्या वृत्तपत्र दिंडीने वेधले लक्ष
क्रांती चौकातील उड्डाणपुलाखाली विविध वर्तमानपत्रांची पालखी ठेवण्यात आली होती. या पालखीचे पूजन करून या वृत्तपत्र दिंडीचा प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात व टाळ मृदंगाच्या निनादात निघालेल्या वृत्तपत्र दिंडीने सर्वांचे लक्ष
वेधून घेतले.
What's Your Reaction?






