विदेशात एमबीबीएस करुन डॉक्टर बनण्याची संधी, कौन्सिलिंग सेंटरचे संजय केनेकर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन...!

 0
विदेशात एमबीबीएस करुन डॉक्टर बनण्याची संधी, कौन्सिलिंग सेंटरचे संजय केनेकर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन...!

विदेशात एमबीबीएस करुन डॉक्टर बनण्याची संधी, कौन्सिलिंग सेंटरचे संजय केनेकर यांनी केले उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर, दि.15(डि-24 न्यूज)- नीट परीक्षेत कमी गुण मिळाले तर विद्यार्थ्यांना विदेशात एमबीबीएस करुन डॉक्टर बनण्याची संधी आहे. फक्त इच्छाशक्तीची गरज आहे. कमी खर्चात आपण हे शिक्षण घेवू शकतात.

देशात शिक्षण घ्या किंवा विदेशात भारतीय संस्कृती न विसरता मानवता शिकावी तरच शिक्षणाचे सार्थक होईल व आपले भविष्य उज्ज्वल होईल व आपण उच्च शिक्षण घेतल्यानंतर देशाच्या प्रगतीत हातभार लावावा असे प्रतिपादन आज विदेशात एमबीबीएस व पीजीचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी कौन्सिलिंग सेंटरचे उद्घाटन करताना माजी आमदार संजय केनेकर यांनी केले आहे. 

मजनू हिल येथे ए.व्ही.ग्लोबल ओव्हरसिज एज्युकेशन प्रा.लि.च्या शाखेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून विदेशात मेडीकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कौन्सिलिंग सेंटरचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 

केनेकर यांनी पुढे सांगितले शहरात हजारो कोटींचे नवनवीन उद्योग येत आहे. शहराची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. भविष्यात याच्या जडणघडणीसाठी उच्च शिक्षितांची गरज भासणार आहे. विदेशात शिक्षण घेण्यासाठी ए.व्ही.ग्लोबल संस्थेने संधी उपलब्ध करून दिली आहे विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा. असे म्हणत शाखेचे व्यवस्थापक जमील सानी व अजहर जकीयोद्दीन सिद्दीकी यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी व्यासपीठावर डॉ.रफीक झकेरिया वूमेन्स काॅलेजचे प्राचार्य डॉ. मगदूम फारुकी, ए.व्ही.ग्लोबल ओव्हरसिज एज्युकेशन प्रा.लि.चे संस्थापक तथा संचालक विजय काटे, अमोल जैस्वाल, बीएमसी बँकेचे संचालक मंजूर खान, सेवानिवृत्त डिवायएसपी पुणे सादीक देशमुख, डॉ.शोएब हाश्मी, डॉ.सरताज पठाण, शोएब खुसरो, शारेक नक्शबंदी, नासेर सिद्दीकी, जेष्ठ पत्रकार अब्दुल हाफिज, डॉ.मुजीब टोपीवाला, एजाज खान, मुबीन टोपीवाला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त उप प्राचार्य जकीयोद्दीन सिद्दीकी यांनी केले. शहरातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुष्पगुच्छ देऊन शाखेच्या संचालकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow