उस्मानपुरा मनपा प्राथमिक विद्यालयात हॅन्ड वाॅश स्टेशन व वाॅशरुमचे लोकार्पण...!
उस्मानपुरा मनपा प्राथमिक विद्यालयात हॅण्ड वॉश स्टेशन व वॉशरूम चे लोकार्पण...
लुपिन कंपनीने शहराच्या सौंदर्यकरणात सहभाग घ्यावा महापौर यांचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)-लुपिन फाउंडेशनच्या वतीने सीएसआर निधी अंतर्गत मनपा प्राथमिक विद्यालय उस्मानपुरा येथे विद्यार्थ्यांसाठी हॅन्ड वॉश स्टेशन, वॉशरूम बांधून देण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज महापौर श्री.समीर राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी, महिला व बालकल्याण सभापती शोभा बुरांडे, नगरसेविका शिल्पा वाडकर, मनपा उपायुक्त अंकुश पांढरे, लुपिन कंपनीचे प्लांट हेड विष्णुदास असावा, व्यंकटेश शेट्टी, पूजा जैन विकास ढवळे, बाळासाहेब गर्जे, शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे ,कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर सांगळे, प्रशासन अधिकारी संजीव सोनार , विस्तार अधिकारी विजय कोल्हे व रईसा बेगम, मुख्याध्यापक शशिकांत उबाळे, मुख्याध्यापक बाळा जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना महापौर महोदय यांनी लुपिन कंपनींचे वतीने बांधून देण्यात आलेल्या हॅण्ड वॉश स्टेशन व वॉशरूम बद्दल आभार मानले.
तसेच महिलांसाठी शौचालय तयार करणे व त्याची देखभाल करणे करिता कंपनीने किमान
एक शौचालय तयार करून द्यावे या करिता मनपा प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल असे ते म्हणाले.
तसेच शहरात प्रवेश करताना पर्यटकांना आपले शहर सुंदर ,स्वच्छ दिसावे यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ठिकठिकाणी सौंदर्यकरण करण्यात येत आहे. या उपक्रमात लुपिन कंपनीने आपला सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले
.
What's Your Reaction?