गणेश विसर्जनाची महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी
निर्माल्य दान महापालिकेला केला तर अर्धा किलो खत मोफत...
घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन घरातच करा प्रशासकांचे आवाहन...
गणेश विसर्जनाची महापालिकेतर्फे जय्यत तयारी सुरू...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि 9(डि-24 न्यूज): आगामी 17 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाची जय्यत तयारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे सुरू आहे. याबाबत महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सदरील तयारीचा आढावा आज एका बैठकीत घेतला आणि सूचना केल्या.
यावेळी प्रशासक महोदयांनी नागरिकांना आवाहन केले की त्यांनी घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन घरातच करावे तसेच महानगरपालिकेला निर्माल्य दान करणारे नागरिकांना महानगरपालिका संचालित कचरा प्रक्रिया केंद्रांवर तयार करण्यात आलेली खताचे अर्धा किलोचे पॅकेट त्यांना भेट म्हणून देण्यात येईल. याशिवाय त्यांनी आवाहन केले की विहिरीत गणेश विसर्जन करण्यास नागरिकांनी टाळावे आणि महानगरपालिका तर्फे तयार करण्यात येणारे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे. यावेळी ते म्हणाले की पाच फूट उंचीवरील गणेश मूर्त्यांचे विसर्जन कायगाव टोका येथे करण्यात येईल तसेच या उंचीचा खाली गणेश मूर्ती यांचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येईल. ते म्हणाले की शहरातील आणि आसपास खदानीत पाणी भरून देखील विसर्जन करण्याचा विचार प्रशासनाच्या विचाराधीन आहे. ते म्हणाले की गणेश विसर्जनच्या दिवशी प्रत्येक वार्डात निर्माल्य संकलन करण्यासाठी घंटागाड्या फिरवण्यात येणार आहे.
त्यांनी नागरिकांना आवाहन केले की आपले निर्माल्य महापालिकेला देऊन सहकार्य करावे आणि घरगुती गणेश मूर्त्यांचे विसर्जन घरातच करावे.
What's Your Reaction?