गांधीनगर येथील मनपाच्या मालकिच्या जमिनीवरील अतिक्रमण जमीनदोस्त

 0
गांधीनगर येथील मनपाच्या मालकिच्या जमिनीवरील अतिक्रमण जमीनदोस्त

गांधीनगर येथील मनपाच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण जमीनदोस्त

छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.9(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या गांधीनगर येथील मनपा मालकीच्या जागेवरील अतिक्रमण आज जमीनदोस्त करण्यात आले आहे.

मोहल्ला गांधीनगर येथील मनपा आरोग्य केंद्र लगत मनपाच्या मालकीच्या जमिनीवर काही लोकांनी कब्जा करून जुन्या भिंतीवर नवीन लोखंडी पत्रे चे शेड बांधले होते व इतर खुली जागेवर जेसीबी व रोड रोलर च्या साह्याने सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते.

 आयुक्त तथा मनपा प्रशासक यांच्याकडे तक्रार प्राप्त होताच मा. प्रशासक यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेशित केल्याने मा अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांनी स्वतः प्रत्यक्ष स्थळावर येऊन पाहणी करून उपायुक्त सविता सोनवणे, पदनिर्देशित अधिकारी रमेश मोरे व इमारत निरीक्षक मजहर अली यांना अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेशित केले होते.

  क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस बंदोबस्त घेऊन या ठिकाणी असलेले अतिक्रमण जमीनदोस्त करण्याची कारवाई पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. सदर ठिकाणी बांधलेल्या खोल्यात मोठे प्रमाणत दारूच्या रिकाम्या बाटल्या व जुगारीचे पत्ते सापडल्याने या ठिकाणी बेकायदेशीर जुगारीचा अड्डा सुरू असल्याचे संशय उपस्थित लोकांनी व्यक्त केला होता.

सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त सविता सोनवणे, पद निर्देशित अधिकारी रमेश मोरे,इमारत निरीक्षक मजहर अली, क्रांती चौक पोलिस कर्मचारी ,अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी पार पाडली अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow