महापालिकेचे 17 कर्मचारी सेवानिवृत्त...

 0
महापालिकेचे 17 कर्मचारी सेवानिवृत्त...

महानगरपालिकेचे वर्ग 3 व 4 संवर्गातील एकूण 17 कर्मचारी सेवनिवृत्त...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) - महानगरपालिकेचे वर्ग 2 व 4 संवर्गातील एकूण 17 अधिकारी कर्मचारी नियत वयोमानाने सेवनिवृत्त झाले आहेत.

महानगरपालिका मुख्यालय येथे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास मा. उप आयुक्त लखीचंद चव्हाण सहायक आयुक्त अभय प्रामाणिक,कार्यकारी अभियंता दत्ता गायकवाड यांची उपस्थिती होती.

सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना सेरोमोनियल कॅप, शॉल, पुष्पगुच्छ, सेवा प्रमाणपत्र व सामान्य भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यात आला. मा.अतिरिक्त आयुक्त महोदयांनी सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना पुढील आनंदी ,स्वस्थ निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सेवा निवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यात प्रामुख्याने वर्ग 3 मधील आरोग्य पर्यवेक्षक 1, सहशिक्षिक 1, सहशिक्षिका 2, वरिष्ठ लिपिक 1 , व वाहन चालक 1 यांचा समावेश आहे.तर वर्ग 4 मधील बहुउद्देशीय कामगार मजूर 1, सफाई मजूर 4, शिपाई 1, सेविका 1, मजूर 2 या पैकी एक स्वेच्छा निवृत्ती , सुरक्षारक्षक 1, बांधकाम मजूर 1 (स्वेच्छा निवृत्ती) यांचा समावेश आहे.या कार्यक्रमास सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे कुटुंबीय यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow