सिध्दार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातील बिबटचा मृत्यू...

 0
सिध्दार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातील बिबटचा मृत्यू...

सिध्दार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयातील बिबटचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - पहाटे सिध्दार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातील एक वयोवृद्ध बिबट माझी वय 16 वर्ष नामे रेणू हिचे निधन झाले आहे. सदर बिबट हि मागिल काही दिवसांपासुन आजारी होती. तिच्यावर प्राणी संग्रहालयात पशुवैद्यक डॉ.निती सिंग यांचे मार्फत उपचार सुरू होते. परंतु रेणू ही वयोवृद्ध असल्या कारणाने उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे बिबट मादीचा आज निधन झाले.

बिबट रेणू ही प्राणी संग्रहालयातील आमटेज रेस्क्यु सेंटर, हेमलकसा, जिल्हा गडचिरोली येथून सन 2015-16 मध्ये आणण्यात आले होते. तिचे प्राणिसंग्रहालयात दहा वर्षे वास्तव्य होते. रेणूचे शवविच्छेदन हे डॉ.जयकुमार सातव, डॉ.संदीप राठोड, पशुवैद्यकीय शासकीय पशुचिकीत्सालय, खडकेश्र्वर यांनी केले. पंचनामा करणेसाठी वनविभागाचे अविनाश राठोड, वनपाल, छत्रपती संभाजीनगर व डी.एस.पवार, वनरक्षक, छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते. शवविच्छेदन केल्यानंतर रेणूस सर्वांसमक्ष जाळण्यात आले व घटनेचा पंचनामा करण्यात आला.अशी माहिती प्र.पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow