बायजीपुरा येथील दुहेरी हत्याकांड अनैतिक संबंधातून, पत्नीचा कटात सहभाग

 0
बायजीपुरा येथील दुहेरी हत्याकांड अनैतिक संबंधातून, पत्नीचा कटात सहभाग

दुहेरी हत्याकांड, पत्नीच निघाली आरोपी...

अनैतिक संबंधातून खून : मुलांना संभाळण्याच्या वायद्यामुळे कटात पत्नीचा झाला सहभाग

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) काल बायजीपुरा येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडात आता नवीन ट्वीस्ट समोर आला आहे. मयताच्या पत्नीने आपल्या आरोपी प्रेयकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. सलमान खान आरीफ खान व सुलतान खान ईसा शेख(वय 17)यांची निर्घृण हत्या केवळ कौटुंबिक वादातून नव्हे, तर त्यामागे अनैतिक संबंध, आर्थिक शोषण आणि वैयक्तिक रागाचा स्फोट हे सगळं उभं राहिलं होतं. गुन्ह्यातील आरोपींनी केलेल्या धक्कादायक कबुलीनंतर आता फरिन उर्फ हिना सलमान खान (वय 25) हिला ही या प्रकरणात आरोपी बनविण्यात आले असून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow