इम्तियाज जलील यांचे चिरंजीव बिलाल जलील लग्नबंधनात अडकले...!

इम्तियाज जलील यांचे चिरंजीव बिलाल जलील लग्नबंधनात अडकले...!
श्रीनगर, दि.20(डि-24 न्यूज), छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) चे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांचे जेष्ठ चिरंजीव बिलाल जलिल हे आज जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे लग्नबंधनात अडकले. फैसल अली यांची कन्या जिनेरा सोबत आज त्यांचा निकाह संपन्न झाला आहे. या लग्न समारंभात एमआयएमचे सुप्रीमो तथा खासदार असदोद्दीन ओवेसी, अनंतनागचे आमदार बशिर वीरी, आमदार सय्यद गणी लोन, एमआयएमचे नेते वारीस पठाण व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. निकाह संपन्न झाल्यानंतर इम्तियाज जलील यांच्या कुटुंबाला चाहत्यांनी सोशलमिडीयावर व फोन करुन शुभेच्छा दिल्या.
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) शहरातील टाटा स्टेडियमवर 25 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपासून रिसेप्शन(वलिमा) चे आयोजन करण्यात आले आहे
.
What's Your Reaction?






