तब्लिग जमातचे आमीर मोईन साहेब यांचे निधन...!

 0
तब्लिग जमातचे आमीर मोईन साहेब यांचे निधन...!

तब्लिग जमातचे आमीर मोईन साहेब यांचे निधन...!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) सन 1968 पासून तब्लिग जमातचे विस्तार करण्यासाठी योगदान दिलेले औरंगाबाद शहर जिल्हा तब्लिग जमातचे आमीर याहिया मोईनोद्दीन आमीरोद्दीन (मोईन साहेब) वय 90, राहणार मोमीनपुरा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी लोटाकारंजा येथील मिरजंगू मस्जिद येथे तब्लिग जमातचे आमीर म्हणून दिनची सेवा सुरू केली होती. इस्लाम धर्माचे प्रचार व प्रसारासाठी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सेवा केली. सन 2017 मध्ये लिंबेजळगाव येथे झालेला जागतिक इज्तेमा(आलमी इज्तेमा) व कसाबखेडा येथे झालेल्या जिल्हास्तरीय इज्तेमा त्यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. त्यांची नमाज -ए-जनाजा आज रविवारी सकाळी दहा वाजता ऐतिहासिक जामा मस्जिदमध्ये अदा करण्यात आली. यावेळी शहरातील हजारो लोक उपस्थित होते. त्यांचा दफनविधी तेथील कब्रस्तानात करण्यात आला. त्यांच्या पश्चात चार मुले, चार मुली नाती पोती असा मोठा परिवार आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow