वक्फ बोर्ड पद भरतीसाठी 16 आणि 17 डिसेंबर रोजी परीक्षा

 0
वक्फ बोर्ड पद भरतीसाठी 16 आणि 17 डिसेंबर रोजी परीक्षा

वक्फ बोर्ड पद भरतीसाठी 16 आणि 17 डिसेंबर रोजी परीक्षा

औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) विविध पद भरतीसाठी वक्फ बोर्डाची परीक्षा 16 आणि 17 डिसेंबर रोजी होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे सिईओ मो.बा.ताशिलदार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

4 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणारी परीक्षा प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आली होती आता नवीन तारीख परीक्षेसाठी जाहीर करण्यात आली आहे. 

16 डिसेंबर रोजी, सकाळी 8.30 वाजता

कनिष्ठ अभियंता पदासाठी, विधी सहायक, विधी सहायक पदासाठी सकाळी 8.30 वाजता, लघूटंकलेखक पदासाठी दुपारी 12.30 वाजता, 17 डिसेंबर रोजी, सकाळी 8.30 वाजता अधिक्षक, जिल्हा वक्फ अधिकारी पदासाठी परीक्षा होईल.

कनिष्ठ लिपिक पदासाठी सायंकाळी 4.30 वाजता परीक्षा होईल.

अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र पाठवण्यात येतील. प्रशासकीय कारणास्तव काही बदल झाल्यास सुधारीत सूचना देण्यात येतील.

सदर सूचना https://mdd.maharashtra.gov.in व https:mahawakf.com व https:mahawakf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow