कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहणार - चंद्रकांत खैरे
कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहणार - चंद्रकांत खैरे
कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा प्रतिनिधी मेळावा संपन्न... भारतीय कामगार सेना आयोजित मेळाव्यात इंटक, सिटू, भाकप, मजूर संस्थेसह १२ संघटना एकत्र
औरंगाबाद,दि.4(डि-24 न्यूज )जिल्हाची लाईफलाईन असलेल्या वाळूज, बजाजनगर, चिखलठाण, शेंद्रा, बिडकीन, चितेगाव औद्योगिक भागात कामगार उपजीविका भागवतात. यादरम्यान अनेकदा संस्था आणि कामगार यांच्यात समन्वय घडून आणण्यासाठी या कामगार संघटना मदत करते. यापुढेही कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केले. कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा प्रतिनिधी मेळावा संपन्न झाला. भारतीय कामगार सेना आयोजित मेळाव्यात इंटक, भाकप, मजूर संस्थेसह १२ संघटना एकत्र येत महाविकास आघाडी पाठींबा दिला.
यावेळी शिवसेना उपनेते, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी कामगार शक्ति एकत्र आल्याने आता नक्कीच क्रांती होईल असा विश्वास व्यक्त केला. बजाज ऑटो युनिट अध्यक्ष विलास जाधव यांनी मनोगत व्यक्त करून पाठींबा जाहीर केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन भारतीय कामागरे सेनेचे संयुक्त राज्य चिटणीस प्रभाकर मते पाटील यांनी केले. देशात आता फ्रेंच राज्यक्रांतीची पुनरावृत्ती होणार आहे. ज्यावेळी कामगार ऐकवटतो तेव्हा बदल घडवतो. कामगार हिताचे कायदे बदलून उद्योजक आणि भांडवलदाराच्या हिताचे कायदे हे सरकार आणणार आहे. त्यामुळे आता सत्ता बदल होणार असल्याचे मते पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवसेना मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, अभियंता सेनेचे प्रवीण जाधव, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, अभय टाकसाळ, लक्ष्मण सकरोडकर, दामोदर मानकापे, अजय भवळकर, मंगला ठोंबरे, निकम, डॉ. गोपाळ बचिरे, उपजिल्हाप्रमुख राजू इंगळे, बाप्पा दळवी, सचिन गरड, सागर शिंदे, विलास जाधव, समीर कुरेशी, बाळासाहेब कारले, महेंद्र खोतकर, शिवाजी तुरटवर, शिवाजी अपरे आदींसह कामगार संघटना पदाधिकारी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते
.
What's Your Reaction?