आंबेडकरी चळवळीचे नेते गंगाधर गाडे काळाच्या पडद्याआड, उद्या अंतिम संस्कार

 0
आंबेडकरी चळवळीचे नेते गंगाधर गाडे काळाच्या पडद्याआड, उद्या अंतिम संस्कार

आंबेडकरी चळवळीचे नेते गंगाधर गाडे काळाच्या पडद्याआड, उद्या अंतिम संस्कार

औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यात सर्वात पुढे असणारे आंबेडकरी चळवळीतील नेते, दलित पँथर रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष गंगाधर गाडे यांचे आज शनिवारी पहाटे एशियन हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना दु:खद निधन झाले. यामुळे शहरात शोककळा पसरली आहे. त्यांचे वय 85 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील धगधगता तारा निखळला अशी भावना व्यक्त होत आहे.

गाडे यांचे पार्थिव शरीर उद्या रविवारी 5 मे रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत उस्मानपूरा येथील नागसेन महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संस्थेच्या परिसरात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

गंगाधर गाडे यांचा राजकीय प्रवास बघितला तर आघाडीच्या सरकारमध्ये ते परिवहन राज्यमंत्री होते. पँथर चळवळीत अक्रामक लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे. सन 7 जुलै 1977 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याची मागणी त्यांनी केली होती. अनेक आंदोलने झाली त्यानंतर 1994 रोजी विद्यापिठाचे नामांतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ झाले. नामांतराच्या लढ्यात त्यांची महत्वाची भुमिका होती. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी आंबेडकरी जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. कामगारांच्या हितासाठी लढा उभारला. त्यांचा जन्म सन 1930 साली जिल्ह्यातील पाचोळी गावात झाला. ते पेशाने वकील होते. 1972 साली विधानसभेवर निवडून आले. प्रभावशाली दलित नेते असल्याने त्यांनी शहरात 47 दलित वस्ती वसवल्या. ते जेव्हा विधानसभा निवडणुकीत उभे होते त्यांच्या प्रचारासाठी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, रामदास आठवले, टी.एम.कांबळे, सुरेश कलमाडी यांनी शहरात मुक्काम करुन प्रचार केला होता. औरंगाबाद पश्चिम विधानसभा निवडणुकीत एकदा एमआयएमच्या पाठींब्याने त्यांनी निवडणूक लढली होती. गेल्या पाच वर्षांपासून ते आजारी होते. आज त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांनी निवासस्थानी गर्दी केली. गाडेंच्या निधनाची बातमी कळताच वंचितचे अध्यक्ष एड प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.

ली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow